Homeताज्या बातम्यादेश

फारूक अब्दुल्ला यांचा स्वबळाचा नारा

नवी दिल्ली : इंडिया आघाडी मित्रपक्षांना सोबत घेत लोकसभा निवडणुकीला सामौरे जातांना दिसून येत आहे. मात्र इंडिया आघाडीतून एक-एक पक्ष आणि त्या पक्षाच

अभियंत्याची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या
येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी
एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं आयुष्य

नवी दिल्ली : इंडिया आघाडी मित्रपक्षांना सोबत घेत लोकसभा निवडणुकीला सामौरे जातांना दिसून येत आहे. मात्र इंडिया आघाडीतून एक-एक पक्ष आणि त्या पक्षाचे नेते आघाडीला सोडून जातांना दिसून येत आहे. केजरीवाल व ममता बॅनर्जी यांच्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि  नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतला आहे.
अब्दुल्ला यांनी म्हटले की, जागा वाटपाबाबत मी एक गोष्ट स्पष्ट करतो की, नॅशनल कॉन्फ्रन्स स्वबळावर निवडणूक लढणार आहे. यावर कोणताही संभ्रम नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकाचवेळी होण्याची चिन्हे आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नीतीश कुमार यांनी एनडीएत प्रवेश केल्यापासून इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहेत. जेडीयूनंतर आरएलडी पक्षही आघाडीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे ममता बनर्जी यांनीही एकला चलो चा नारा दिला आहे. आम आदमी पार्टीनेही जागावाटपात नमते न घेता ताठर भूमिका घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा असून तेथेही समाजवादी पार्टीने काँग्रेससोबत आघाडी केलेली नाही. सपा ने काँग्रेससाठी 11 जागा सोडल्या आहेत. नरेंद्र मोदी यांचा सामना करण्यासाठी एकत्र आलेले 28 पक्ष एक एक करून बाहेर पडत आहेत

COMMENTS