Homeताज्या बातम्यासंपादकीय

राज्यसभा आणि राजकीय गणित

देशातील 56 राज्यसभेच्या जागा रिक्त होत असून, त्यासाठी निवडणूक होत आहे. त्यात महाराष्ट्रातील 6 जागा आहेत. यामध्ये भाजपने काँगे्रसमधून आलेले अशोक च

तृणमूलचा काँगे्रसला धक्का
रोजगारनिर्मितीचे आव्हान
नवे वर्ष, नवा जल्लोष

देशातील 56 राज्यसभेच्या जागा रिक्त होत असून, त्यासाठी निवडणूक होत आहे. त्यात महाराष्ट्रातील 6 जागा आहेत. यामध्ये भाजपने काँगे्रसमधून आलेले अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी दिली आहे. त्यानंतर काँगे्रसने पुन्हा एकदा चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने मिलिंद देवरा यांना संधी दिली आहे. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसने विद्यमान राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकाळ अजून चार वर्षांचा प्रलंबित असतांना त्यांना नव्याने उमेदवारी देण्यामागचे गणित काय आहे, असा प्रश्‍न अनेकांना पडतांना दिसून येत आहे.
सहा जागांसाठी सहा उमेदवार आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार यात कोणतीही शंका आता राहिलेली नाही. मात्र राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यामागचे राजकीय गणित अनेकांना अजूनही समजलेले नाही. मुळातच राष्ट्रवादीतील अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या आमदार आणि खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अजित पवार गटाचे आमदार 41 असल्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार ते अपात्र ठरू शकत नाहीत. खासदार मात्र अपात्र ठरू शकतील अशी भीती आहे. त्यामुळेच अजित पवारांनी पटेल यांना पुन्हा एकदा संधी दिल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता सुनील तटकरे राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होते. मात्र त्यांचा पत्ता कापण्यात आला आहे. कारण लोकसभेचे खासदार आहेत. शिवाय त्यांच्यावर पक्षांतरबंदी कारवाईनुसार तटकरेंना अपात्र ठरवले तरी, लोकसभा काही दिवसांतच विसर्जित होणार आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला तसा काही फरक पडणार नव्हता. मात्र मुळात मुद्दा असा आहे की, पटेल अपात्र ठरतील याचे राजकीय गणित अजित पवार गटाला माहित आहे का, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. जर अजित पवार गट साशंक नसता, जर पटेल अपात्र ठरणार नसते, तर अजित पवार गटाने दुसर्‍या उमेदवाराला संधी दिली असती. मात्र गुरूवारी राष्ट्रवादीच्या आमदार-खासदार अपात्र आणि अपात्रतेचा निकाल जाहीर होण्याआधीच अजित पवार गटाने ही राजकीय खेळी खेळली अर्थात, त्यांना पुढील राजकीय गणिते माहित असल्यामुळेच त्यांनी ही खेळी खेळल्याचे दिसून येत आहे. कारण कोणताही पक्ष आपल्या विद्यमान खासदाराला राजीनामा देवून, त्याला पुन्हा खासदार करणार, यात कुठली आली रणनीती. हा तर पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार सर्वसामान्य समजतील. अजित पवार गट पार्थ पवारांच्या नावासाठी देखील आग्रही होता. मात्र आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँगे्रस अजित पवारांच्या हाती देऊन टाकली आहे, शिवाय निवडणूक आयोगानुसार आता अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष. अशावेळी त्यांनीच जर पार्थला उमेदवारी दिली असती तर, घराणेशाहीचा आरोप त्यांच्यावर झाला असता. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप चिकटू नये, यासाठी अजित पवारांनी पार्थला संधी देणे टाळले असावे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाकडून राज्यसभा सभापतींकडे प्रफुल्ल पटेल यांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या प्रकरणी जर पटेल अपात्र ठरले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तासंघर्षावर त्यांचा मोठा परिणाम होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पटेलांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा रिक्त होतांना दिसून येत आहे. या जागेसाठी जेव्हा पोटनिवडणूक लावली जाईल, तेव्हा इतर नावांचा विचार केला जाईल, अर्थात ते नाव पार्थ पवारांचे देखील असू शकते. मात्र या शक्यता असल्या तरी, राजकारणात काहीही उलटफेर होवू शकतो.

COMMENTS