Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टँकरने 2 शाळकरी मुलींना चिरडले

उमरगा ः तालुक्यातील येणेगूर येथे टँकरने दोन शाळकरी मुलींना चिरडले. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही भीषण घटना बुधवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वांसाठी आरोग्य संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद
नारायण टेक्नो नांदेड या शाळेस शासनाची मान्यता नाही
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे उद्या होणार उद्घाटन

उमरगा ः तालुक्यातील येणेगूर येथे टँकरने दोन शाळकरी मुलींना चिरडले. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही भीषण घटना बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. श्रेया पात्रे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सोलापूर हैदराबाद-महामार्गा रोखून धरला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक तुंबली असून, वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात. अपघात घडताच संतप्त नागरिकांनी टँकरचालकास अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

COMMENTS