Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक चव्हाण यांना भाजप कडून राज्यसभेची उमेदवारी

मुंबई प्रतिनिधी - आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण यांना वेलकम गिफ्ट भाजपने द

परमवीर सिंग यांनी सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची; पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप
गणेशोत्सव मंडळांना दिलासा
बीड शहरातील इमामपुर रोडलगतचे अतिक्रमण नगर परिषदेने न काढल्याने स्वातंत्र्यदिनी अमरण उपोषण -सुनील महाकुंडे

मुंबई प्रतिनिधी – आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण यांना वेलकम गिफ्ट भाजपने दिलंय. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांना मोठा धक्का बसलाय, असं म्हटंल तर वावगं ठरणार नाही. तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार का? असा सवाल विचारला जातोय. 

काँग्रेसकडून देखील राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  महाराष्ट्र काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. तर अजित पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट कोणाला उमेदवारी देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एवढंच नाही तर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बैठकांचा सपाटा देखील लागू शकतो. तर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा गुजरात मधून राज्यसभेवर जातील. काँग्रेसकडे 45 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार काँग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाही. तर भाजपकडे 104 आणि अन्य 13 अपक्ष आमदारांची मतं आहेत.त्यानुसार भाजपच्या 3 जागा सहजपणे निवडून येऊ शकतात. त्याचबरोबर शिंदे गटाकडे 39 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा एक उमेदवार निश्चित येऊ शकतो. तर ठाकरे गट आणि शरद पवार गट मिळून एक उमेदवार देण्याची शक्यता आहे

COMMENTS