Homeताज्या बातम्यादेश

महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा आमदार भाजपमध्ये

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोक दल (रालोद) या पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी इंडिया आघाडीला रामराम केला आहे. चौधरी यांनी आपण आघाडीतून बाहेर पडत असल्

कोकणात सापडले वर्षांपूर्वीची हत्यारे
 आदित्य ठाकरेंच्या शेतकरी संवाद यात्रेवर भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णींचा निशाणा
राहुरी कॉलेजमधील शेकडो झाडांना आस पाण्याची

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोक दल (रालोद) या पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी इंडिया आघाडीला रामराम केला आहे. चौधरी यांनी आपण आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. तसेच त्यांच्या पक्षाने एनडीएत (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याची बातमी ताजी असतानाच उत्तर प्रदेशात काँग्रेससह इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

रालोद एनडीएत सहभागी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होत्या. दरम्यान, जयंत चौधरी यांनी आज दि. 12 रोजी पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी एनडीएत सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जयंत चौधरी यांचे आजोबा आणि भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह यांना भारत रत्न दिला जाणार असल्याची घोषणा केली. सरकारच्या या घोषणेनंतर रालोद प्रमुख जयंत चौधरी भावूक झाले. या पुरस्काराबद्दल जयंत चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच त्यांना सपा-काँग्रेसबरोबरची युती तोडून भाजपाबरोबर जाणार का? असा प्रश्‍न विचारल्यावर ते म्हणाले, आता कुठल्या तोंडाने मी नकार देऊ?

COMMENTS