Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक

नागपूर ः नव्याने उघडलेल्या वांगेतुरी आणि गरदेवाडा चौक्यांची रेकी करण्याच्या उद्देशाने एकत्र जमा झालेले नक्षल आणि पोलिसांत झालेल्या चकमकीत नक्षलवा

अभिनेता सोनू सूदच्या मुलाला शमीने दिले क्रिकेटचे टिप्स
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभाग घ्यावा
कैद्यांमध्ये गोळीबार, तिघे ठार

नागपूर ः नव्याने उघडलेल्या वांगेतुरी आणि गरदेवाडा चौक्यांची रेकी करण्याच्या उद्देशाने एकत्र जमा झालेले नक्षल आणि पोलिसांत झालेल्या चकमकीत नक्षलवादी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र पोलिसांनी नक्षली सोडून गेलेले विस्फोटक साहित्य जप्त केले. सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर-नारायणपूर-गडचिरोली ट्रायजंक्शनवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर गावात तळ ठोकून आहेत अशी विश्‍वासार्ह माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. हिद्दूर गावापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असताना नक्षल्यांकडून तीव्र गोळीबार करण्यात आला.

COMMENTS