Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जप्तीची वाहने विक्री केल्याने चार पोलिस निलंबित

पुणे ः वेगवेगळ्या कारवाईतील पोलिसांनी जप्त केलेल्या चारचाकी व दुचाकी आणि बेवारस वाहने पोलिस कर्मचार्‍यांनीच परस्पर विक्री केल्याचा प्रकार लोणी का

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नोटीसांच्या धाकामुळे विष प्राशन
LokNews24 l लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल, शिवसेनेची टीका
बस स्थानकाच्या डबक्यामध्ये घातला चिखलाचा अभिषेक

पुणे ः वेगवेगळ्या कारवाईतील पोलिसांनी जप्त केलेल्या चारचाकी व दुचाकी आणि बेवारस वाहने पोलिस कर्मचार्‍यांनीच परस्पर विक्री केल्याचा प्रकार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात उघडकीस आला. त्यानंतर परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी 4 पोलिस कर्मचार्‍यांचे तडकाफडकी निलंबन केले.
नुकतेच उरळीकांचन पोलिस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले ते पुणे ग्रामीण पोलिस अंतर्गत येते. लोणी काळभोर व उरळीकांचन पोलिस ठाण्यातील मालमत्तेचे विभाजन करतांना वाहन चोरीचा प्रकार लक्ष्यात आला. पोलिस हवालदार दयानंद दशरथ गायकवाड, पोलिस नाईक संतोष शंकर आंदुरे, पोलिस शिपाई राजेश मनोज दराडे व पोलिस शिपाई तुकाराम सदाशिव पांढरे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ठाण्यात जमा केलेल्या गाड्या 9 दुचाकी आणि 9 कार अशी 18 वाहने विक्री करून 4 लाख 60 हजार रुपये प्राप्त केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे सदर पोलिस कर्मचारी हे विना परवानगी कर्तव्यावर गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचे वर्तन हे पोलिस खात्याच्या शिस्तीस धरुन नसून अत्यंत गंभीर, बेजबाबदार व गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य त्यांनी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे निलंबन केल्याचे आदेशात म्हटले आहे

COMMENTS