श्रीगोंदा प्रतिनिधी ः तालुक्यातील कोथूळ शिवारात 35 वर्षीय तरुणाचा त्याच्या राहत्या घरी धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना घड
श्रीगोंदा प्रतिनिधी ः तालुक्यातील कोथूळ शिवारात 35 वर्षीय तरुणाचा त्याच्या राहत्या घरी धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली असून योगेश सुभाष शेळके वय 35 असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, योगेश शेळके हे त्यांच्या राहत्या घरी असताना मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास तोंड बांधून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी योगेश शेळके हे झोपलेले असताना त्यांच्या गळ्यावर, हातावर, उजव्या पायावर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार केले. तसेच फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावू तू ओरडली तर तुला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली. याबाबत फिर्यादी आरती योगेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात भा. द. वि. 302, 452, 506,34 शस्त्र अधि. 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्या नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS