Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित पवारांचा मंत्री पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानी चा दावा

पुणे ः राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. ईडी चौकशी प्रकरण

जामखेड-सौताडा 548-डी राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम
रत्नदीपच्या उपोषणकर्त्या मुला-मुलींचा मोठा भाऊ म्हणून उभा
शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू ः आ. रोहित पवार

पुणे ः राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. ईडी चौकशी प्रकरणी खोटे व चुकीचे आरोप केल्याप्रकरणी पुणे न्यायालयात रोहित पवार यांच्याकडून 100 कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. रोहीत पवार यांची ईडी चौकशीनंतर गुलाबराव पाटील यांनी डल्ला मारला असेल, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता. तसेच गल्ला जर मारला असेल, डल्ला खाल्ला असेल तर चौकशीला जावेच लागेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्याविरोधात रोहित पवारांनी हा खटला दाखल केला आहे.

COMMENTS