Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फोटोकॉपी व्हेंडर्समध्ये कॉपीराइट संबंधी जागरुकतेचा प्रसार

नाशिक प्रतिनिधी - नवनीत एज्युकेशन लिमिटेडने (एनईएल) बनावटीकरणाशी लढा देण्यासाठी आणि बौद्धिक संपदा अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी निर्णायक पाऊल

संतसाहित्य आणि तीर्थस्थळे ही मानवी जीवनाची अमृतस्थळे
आदिवासी बांधवांनी विकास योजनांबाबत जागरूक रहावे
पुण्यात दोघांची हत्या करून वाशिम गाठलं अन् जंगलात लपला

नाशिक प्रतिनिधी – नवनीत एज्युकेशन लिमिटेडने (एनईएल) बनावटीकरणाशी लढा देण्यासाठी आणि बौद्धिक संपदा अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले आहे. काही कार्यपद्धतींच्या वैधतेवर प्रकाश टाकण्याच्या उद्दिष्टाने एनईएलने फोटोकॉपी व्हेंडर्ससोबत एक सर्वसमावेशक कॅम्पेन सुरू केले असून या माध्यमातून कॉपीराइट उल्लंघनाबद्दल जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.अनेक व्यक्तींना कायदेशीर कारवाईबद्दल पूर्ण माहिती असेलच असे नाही, हे समजून घेत नवनीतने पुढाकार घेत हा मुद्दा थेट हाताळायचे ठरवले आहे. या पुढाकाराचा भाग म्हणून विविध शहरांमध्ये निश्चित उद्दिष्टाने काही पावले उचलण्यात येणार आहेत. यात कायदे अंमलबजावणी एजन्सी, नवनीतचे स्थानिक प्रतिनिधी, समुदाय नेते आणि गोपनीय पद्धतीने निरीक्षण करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.कंटेन्ट क्रिएटर्सच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि शैक्षणिक साहित्यासाठी न्याय्य वातावरणाची खातरजमा करणे यासाठी नवनीतची अढळ प्रतिबद्धता या धोरणात्मक प्रयत्नांमधून दिसून येते. या पुढाकारांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन कॉपीराइट कायद्यांचा आदर करण्यावर भर देत बनावटीकरणाच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरुकता निर्माण करणे हे नवनीतचे उद्दिष्ट आहे.नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या ब्रँडिंग विभागाचे प्रमुख देविश गाला म्हणाले, “नवनीत एज्युकेशन लिमिटेड बौद्धिक संपदेचा आदर करण्याच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. बनावटीकरण केल्यास होणाऱ्या कायदेशीर परिणामांबद्दल व्यापारी भागीदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा आणि त्यांना प्रशिक्षित करण्याचा या कॅम्पेनचा हेतू आहे. असे करून, नैतिक कार्यपद्धतींना प्रोत्साहन देणे आणि कंटेन्ट क्रिएटर्सच्या हिताचे संरक्षण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. विविध शहरांमधील फोटोकॉपी व्हेंडर्सशी सक्रिय संवाद साधणे हे न्याय्य शैक्षणिक कार्यपद्धतीची खातरजमा करण्यासाठी महत्त्वाचे आहे. कॉपीराइट कायद्याचा आदर करण्याचे महत्त्व समजून घेण्याकडे होणारे दुर्लक्ष कमी करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वैध, उत्तम दर्जाचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही एनईएलची खंबीर भूमिका आहे.

COMMENTS