रत्नागिरी ः ठाकरे आणि शिंदे गटातील द्वंद पुन्हा एकदा रंगतांना दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंवर तोफ डागतांना म्ह
रत्नागिरी ः ठाकरे आणि शिंदे गटातील द्वंद पुन्हा एकदा रंगतांना दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंवर तोफ डागतांना म्हटले आहे की, आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे, खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकीत कोकणी माणूस शिवसेनेला साथ देईल असे शिंदे यावेळी म्हणाले. तसेच विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी तत्वांची लढाई केलेली आहे. सत्तेपेक्षा विचार मोठे आहेत. बाळासाहेबांची संपत्ती नको मला त्यांची विचार हवे आहेत असेही शिंदे ावेळी म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे सोमवारी शिवसेनेच्या वतीने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात होत आहे. मिशन 48, शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राचे. ही टॅगलाईन घेऊन या संकल्प अभियानाला सुरुवात होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही रत्नागिरी दौर्यावर आलेत. या कार्यक्रमावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणूकांची रणनीती स्पष्ट केली. मुंबई ठाण्यासह सिंधुदुर्ग रत्नागिरी हे शिवसेनेचे दोन फुफुस आहेत. उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी मला खंबीर साथ दिली त्यांनी मंत्रीपद सोडले, असेही शिंदे यावेळी म्हणाले. बाळासाहेबांना एक दिवसाचा पंतप्रधान व्हायचे होते. त्या एका दिवसामध्ये राम मंदिराचा निर्णय आणि कश्मीरमधील 370 कलम काढून टाकायचे होते. त्यांचे हे स्वप्न आता हे सरकार पूर्ण करत आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी मोदीजींना शाबासकी दिली असती. पण आज काय ते टीका करतात राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करत आहेत.. असा टोलाही त्यांनी लगावला. हा मुख्यमंत्री काम करणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. मुंबई स्वच्छता अभियान सुरू केलं लोकांच्या पोटात दुखू लागले फक्त मुंबई नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र स्वच्छता राबवणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
COMMENTS