Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलाच्या हळदीत नाचतांना बापाचा मृत्यू

सोलापूर ः  मुलाच्या लग्नाच्या वरातीत बापाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सुभाष देवमारे असे मयत पित्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हळदी

नियमबाह्य रीतीने चालविण्यात येत असलेले  दारूचे दुकान तात्काळ बंद करा
लातूरमधील आगीत तिघांचा होरपळून मृत्यू
अहमदपुरात भाजपची सवाद्य दुचाकी रॅली

सोलापूर ः  मुलाच्या लग्नाच्या वरातीत बापाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सुभाष देवमारे असे मयत पित्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हळदीच्या लग्नमंडपात शोककळा पसरली. तसेच संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा मंगळवारी दुपारी लग्न सोहळा आयोजित केला होता. दरम्यान काल रात्री डॉल्बीच्या दणदणाटामध्ये नवरदेवाची हळदीची वरात सुरू होती. नवरदेवाची वरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली. वरात आल्यानंतर डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे वधू पिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

COMMENTS