Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मानखुर्दमध्ये वृद्धेवर बलात्कार

मुंबई : घरी सोडण्याच्या बहाण्याने 64 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर एकाने बलात्कार केल्याची घटना मानखुर्द येथे घडली आहे. आरोपीने महिलेला जबर

आईस्क्रीममध्ये आढळले माणसाचे बोट
जेऊर बाजारतळावर दगडफेक
प्रधानमंत्री मोदींच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त कोण-कोणते कार्यक्रम होणार?

मुंबई : घरी सोडण्याच्या बहाण्याने 64 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर एकाने बलात्कार केल्याची घटना मानखुर्द येथे घडली आहे. आरोपीने महिलेला जबर मारहाण देखील केली आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला मासे विक्रीचा व्यवसाय करते. सोमवारी रात्री 11 च्या सुमारास ती घरी जात असताना रस्त्यात तिला उमेश ढोक (वय 38) हा आरोपी भेटला. दुचाकीवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला मानखुर्द महाराष्ट्र नगर येथील त्याच्या घरी नेले. या ठिकाणी आरोपीने तिला एका खोलीत डांबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला जबर मारहाण करत पहाटे 5 च्या सुमारास घराबाहेर सोडले.

COMMENTS