Homeताज्या बातम्यामनोरंजन

रणदीप हुड्डा आणि लिन लॅशरामने लग्नानंतर दिली रिसेप्शन पार्टी

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचा हँडसम रणदीप हुड्डाने ३० नोव्हेंबरला गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत मणिपूरमध्ये लग्नगाठ बांधली. मणिपूरच्या इंफाळ शहरात

दारुसाठी पत्नीस संपवण्याची धमकी
बहे घटनेतील जखमी सचिन पाटील यांचा मृत्यू
आरक्षण : राजकीय पक्षांचा झुंजवण्याचा खेळ !

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचा हँडसम रणदीप हुड्डाने ३० नोव्हेंबरला गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत मणिपूरमध्ये लग्नगाठ बांधली. मणिपूरच्या इंफाळ शहरात मेईतेई रितीरिवाजांनुसार रणदीप आणि लिनने अतिशय साध्या आणि पारंपारिक पद्धतीने लग्न केले. त्याच्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक उपस्थित होते.आता रणदीपने लग्नानंतर मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी ठेवली होती. रणदीपच्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी रणदीप आणि लिन दोघेही खूपच क्युट दिसत होते. रणदीपने सोशल मीडियावर रिसेप्शन पार्टीचे क्युट फोटो शेअर केले आहेत. मर्डर 3′, ‘सरबजीत’, ‘हायवे’ आणि ‘सुलतान’ या चित्रपटामध्ये दमदार अभिनय करत प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या रणदीप हुड्डाने काही दिवसांपूर्वी त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर सोमवारी त्याने मुंबईत रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या जंगी रिसेप्शन पार्टीमध्ये रणदीप आणि लिन यांच्या मित्र परिवारासोबत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत दोघांना शुभेच्छा दिल्या. या रिसेप्शन पार्टीला अभिनेत्री तमन्ना भाटिया, विजय वर्मा ते उर्वशी रौतेलापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. रणदीप आणि लिनचे या रिसेप्शन पार्टींचे रोमँटिक फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो इन्स्टावर शेअर करत रणदीपने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘In our eternal garden of Eden’ असे लिहिले आहे. रणदीप आणि लिन रिसेप्शन पार्टीत खूपच सुंदर दिसत होते. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहेत.

COMMENTS