Homeताज्या बातम्यादेश

गुगल ड्राईव्हमधून आपोआप डेटा डिलीट; कंपनीचा यूजर्सना इशारा

आपल्यापैकी कित्येक जण गुगलचा वापर करतात. डेटा बॅकअप करण्यासाठी गुगल ड्राईव्हचा वापरही बरेच लोक करत असतात. मात्र, आता गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह केल

सांगली जिल्ह्यातील 4 कारखान्यांची 26 हजार 631 टन होणार निर्यात
चांदीच्या पूजेच्या भांड्यांची चोरी उघडकीस; दोघांना अटक, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत
जास्त उत्पादन घेण्यात ड्रोनचे योगदान मोलाचे ठरणार : प्रतीक पाटील

आपल्यापैकी कित्येक जण गुगलचा वापर करतात. डेटा बॅकअप करण्यासाठी गुगल ड्राईव्हचा वापरही बरेच लोक करत असतात. मात्र, आता गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेला डेटा गायब होत असल्याची तक्रार कित्येक यूजर्सनी केली आहे. यानंतर कंपनीने इतर यूजर्सना एक इशारा दिला आहे.

गुगलने स्पष्ट केले आहे, की काही यूजर्ससोबत ड्राईव्हवरील डेटा गायब होण्याची घटना घडली आहे. 84.0.0.0 ते 84.0.4.0 यापैकी एक व्हर्जन वापरणार्‍या यूजर्सना ही समस्या जाणवत असल्याचे समोर आले आहे.

एका यूजरने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे, की त्याचा मे महिन्यापासून आतापर्यंत गुगल ड्राईव्हवर बॅकअप घेतलेला सर्व डेटा गायब झाला आहे. त्याने गुगल सपोर्ट टीमच्या मदतीने डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. गुगल कम्युनिटी सपोर्टवर अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी आल्या आहेत.

दरम्यान, गुगल ड्राईव्ह टीमने डेस्कटॉप यूजर्सना एक इशारा दिला आहे. डेटा रिकव्हर करण्यासाठी तसेच हा प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तेंव्हा, यूजर्सनी आपल्या बाजूने कोणतीही प्रक्रिया करू नये, तसेच चुकूनही डिस्कनेक्ट अकाउंट या पर्यायावर क्लिक करू नये, असे गुगलने म्हटले आहे.

COMMENTS