Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रपती मुर्मू यांच्या दौर्‍याची चोख व्यवस्था ठेवावी

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे प्रशासनाला निर्देश

अहमदनगर ः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अहमदनगर जिल्ह्यात संभाव्य दौरा असून दौर्‍यादरम्यान चोख व्यवस्था ठेवण्याबरोबरच अधिकार्‍यांनी नेमून दिलेल

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे
विद्यार्थी प्रगत तर राष्ट्र प्रगत: महापौर रोहिणी ताई शेंडगे
शिक्षकाला केलं जिवंतपणीच मृत घोषित l LokNews24

अहमदनगर ः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अहमदनगर जिल्ह्यात संभाव्य दौरा असून दौर्‍यादरम्यान चोख व्यवस्था ठेवण्याबरोबरच अधिकार्‍यांनी नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. दौर्‍याच्या सुरक्षा व्यवस्थेत ब्लू बुकमधील सूचनांची काटेकोरपणे अमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संभाव्य अहमदनगर जिल्हा दौर्‍याच्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील सभागृहात पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील  आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, राष्ट्रपती थांबणार आहेत त्या विश्रामगृह तसेच भेट देणार असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा.  राष्ट्रपती ज्या मार्गाने  प्रवास करणार आहेत त्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यात यावे. आवश्यकतेनुसार रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्यात यावी. मान्यवर भेट देण्यात येणार्‍या ठिकाणी स्वच्छता राहील यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले. संपूर्ण दौर्‍यादरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवावा. रस्त्यावरील सर्व विद्युत तारांची तपासणी करण्यात यावी. अद्यावत आरोग्य पथक सर्व सुविधांसह सज्ज ठेवण्यात यावे. दौर्‍यादरम्यान कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच या काळामध्ये कुठल्याही अधिकारी, कर्मचार्‍याने विनापरवानगी मुख्यालय न सोडण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी उपस्थित अधिकार्‍यांना यावेळी दिल्या. बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS