Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेब थोरातांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

खंडकरी शेतकर्‍यांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल गौरव

संगमनेर ः सातत्याने 52 वर्षे खंडकरी शेतकर्‍यांची चळवळ उभारून काम करत त्यांना न्याय देण्याचे काम करणारे कॉम्रेड स्वर्गीय माधवराव गायकवाड यांच्या व

सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत नाही – काँग्रेस नेते आमदार थोरात
राज्यात चांगला पाऊस होऊन शेतकरी सुखी होऊ दे
युती सरकारला लाडकी बहीण नको तर लाडकी सत्ता हवी

संगमनेर ः सातत्याने 52 वर्षे खंडकरी शेतकर्‍यांची चळवळ उभारून काम करत त्यांना न्याय देण्याचे काम करणारे कॉम्रेड स्वर्गीय माधवराव गायकवाड यांच्या विचारांचा वारसा जपत खंडकरी शेतकर्‍यांसाठी महसूलमंत्री पदाच्या काळात अत्यंत चांगली योजना राबवून या शेतकर्‍यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटना व स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कॉम्रेड गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमदार बाळासाहेब थोरात यांना कॉम्रेड भालचंद्र कांगो यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी. आमदार लहू कानडे, मा. आ भानुदास मुरकुटे, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, मा. आ भाऊसाहेब कांबळे, ड भाऊसाहेब लांडगे ,साधनाताई गायकवाड ,कॉ. स्मिता पानसरे, करण ससाने, बी.डी. पाटील, लक्ष्मण निंबाळकर, हेमंत ओगले, रावसाहेब थोरात, गंगाधर चौधरी, सचिन गुजर, बन्सी सातपुते, पांडुरंग शिंदे आणि उपस्थित होते. या पुरस्कारानंतर आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, कॉ माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार माझ्यासाठी जीवनातील अविस्मरणीय आहे. कॉम्रेड गायकवाड यांनी खंडकरी शेतकर्‍यांचा सुरू केलेला प्रश्‍न मला माझ्या कार्यकाळात सोडवताना हे मी माझी मोठे भाग्य समजतो. खंडकरी शेतकर्‍यांना जमीन वाटपाचा प्रश्‍नाला त्यावेळी अनेक अडचणी निर्माण झाल्या. सुप्रीम कोर्टात हा निकाल शेतकर्‍यांच्या बाजूने लागला असला .तरी वाटपाचा मोठा प्रश्‍न होता मात्र स्वर्गीय जयंतराव ससाणे यांनी सर्व निकम सांभाळून जमीन वाटवाबाबत मदत केली. आणि त्यांनी न भूतो न भविष्यती असा मोठा कार्यक्रम श्रीरामपूर घेऊन शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम केले. शेतकरी सर्वसामान्य माणूस यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठीच आपण कायम काम केले असून या पुरस्काराने काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याची ते म्हणाले, तर कॉम्रेड भालचंद्र कांगो म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकर्‍यांसाठी मोठे काम केले आहे. महाराष्ट्राचे आदर्श कृषी व महसूल मंत्री म्हणून त्यांचे नाव कायम स्मरणात राहील. त्याचबरोबर देशात सध्या भांडवलदारांना पोषक राजकारण होत असून वन नेशन वन इलेक्शनच्या नावाखाली लोकशाही व संविधान धोक्यात आणण्याचे काम काही लोक करत आहेत. लोकशाहीला वाचवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीची स्थापना झाली असल्याचीही ते म्हणाले, यावेळी कॉम्रेड अण्णासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, करण ससाने आदींनी मनोगत व्यक्त केली.

खंडकरी शेतकर्‍यांसाठी थोरातांचे मोठे योगदान ः डॉ भालचंद्र कांगो- लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्री, शिक्षण मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर महसूल मंत्री पदाची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळताना या खात्याला हायटेक बनवले. त्यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री  या नात्याने केलेले दिशादर्शक व उल्लेखनीय काम पुढील अनेक पिढ्या लोकांच्या स्मरणात राहणार असून याचबरोबर अनेक दिवस प्रलंबित असलेल्या खंडकरी शेतकर्‍यांचा प्रश्‍न मार्गी लावला .त्यांनी खंडकरी शेतकर्‍यांच्या जीवनात मोठा आनंद निर्माण केले असल्याचे गौरवोद्गार कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी काढले आहे.

COMMENTS