Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी  गौतम पब्लिक स्कूलचा संघ रवाना

कोपरगाव : बालेवाडी, पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूलचा हॉकी संघ रवाना झाला असून संस्थेचे चेअरमन माजी आमदा

सोमैयाच्या अक्षय आव्हाडची ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड
करंजीत अखंड हरीनाम सप्ताहाची जल्लोषात सांगता
राजकीय पक्षांची चिन्हेही गोठवली जावीत…राळेगण सिद्धीच्या बैठकीत ठराव

कोपरगाव : बालेवाडी, पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूलचा हॉकी संघ रवाना झाला असून संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांनी शाळेमध्ये समक्ष भेट देऊन संघास पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
 शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले की, नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने प्रथम फेरीत विजय मिळवत दुसर्‍या फेरीत नेत्रदीपक कामगिरी केली असल्याचे यावेळी सांगितले. गौतमच्या शालेय हॉकी संघाने विभागीय पातळीवर झालेल्या स्पर्धेत उपांतपूर्व सामन्यात पुणे विभागावर तर उपांत्य सामन्यात सोलापूर विभागावर दणदणीत विजय मिळवत पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी आपली विजयी परंपरा कायम ठेवत आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे व क्रिडा शिक्षक इसाक सय्यद यांचे बरोबर गौतमचा हॉकी संघ पुणे येथे होणार्‍या स्पर्धेकरिता रवाना झाला आहे.गौतमच्या हॉकी संघास प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली फिजीकल  डायरेक्टर सुधाकर निलक, हॉकी  प्रशिक्षक रमेश पटारे, सर्व क्रिडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. सदर स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.आ. अशोकराव काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, विश्‍वस्थ मान.आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ.चैताली काळे तसेच संस्थेचे सर्व सदस्य यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS