Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जवळा ग्राम सचिवालयासाठी 25 लाखाचा निधी मंजूर

प्रशांत शिंदेंच्या मागणीला अखेर यश

जामखेड ः भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांची कर्मभूमी तसेच राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाच्या तालुक्यातील मोठ्या असलेल्या जवळा ग्रामपंचायतवर भाजपचा झें

विवाहितेस मारहाण करुन घराबाहेर हाकलले चौघा विरुद्ध गुन्हा दाखल 
 बाबासाहेब कवाद निघोज पतसंस्था सभासदांना देणार १२ टक्के लाभांश- श्री वसंत कवाद
हनुमंत पाटीलबा गायकवाड यांचे निधन

जामखेड ः भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांची कर्मभूमी तसेच राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाच्या तालुक्यातील मोठ्या असलेल्या जवळा ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकताच आमदार शिंदे यांनी जवळा ग्रामस्थांना दिवाळीचे मोठे गिफ्ट दिल्याने ग्रामस्थांनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.जवळा गावात ग्रामसचिवालयाची भव्य इमारत निर्माण करण्यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून 25 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
जवळा ग्रामपंचायतमध्ये नूकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जवळा ग्रामविकास पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत ग्रामपंचायतवर दुसर्‍यांदा सत्ता स्थापन केली. या निकालानंतर प्रशांत शिंदे व ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच व दहा ग्रामपंचायतच्या सदस्यांनी जवळा गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.  यावेळी युवा नेते प्रशांत शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी विविध मागण्यांचे निवेदन आमदार प्रा.राम शिंदे यांना दिले. आमदार प्रा.राम शिंदे यांनी जवळा गावात भव्य ग्रामसचिवालय उभारण्यासाठी 25 लाख रूपये निधीची घोषणा केली. यावेळी आमदार शिंदे यांनी निधीचे पत्र युवा नेते प्रशांत शिंदे, सरपंच सुशिल आव्हाड, काकासाहेब वाळुंजकर, राहूल वाळुंजकर,महेंद्र खेत्रे व जवळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिले. यावेळी जवळा गावजवळा गावच्या विकासासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी आजवर कोट्यावधींचा निधी दिला आहे.  नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शितल प्रशांत शिंदे, सोनाली राहूल पाटील, रफिकभाई शेख, राधिका मारूती हजारे, भाऊसाहेब महारनवर, मंगल आव्हाड, नंदा कल्याण आव्हाड, हरिदास हजारे, सारिका रोडे, जयश्री कोल्हे जवळा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख मुरली अण्णा हजारे, काकासाहेब वाळुंजकर, दशरथ कोल्हे,सोमनाथ वाळुंजकर, तुकाराम भाऊसाहेब हजारे, प्रमोद कोल्हे, प्रविण मेहेर, महादेव हजारे,अमोल रोडे, एकनाथ हजारे, अनंता लेकुरवाळे, दीपक देवमाने, सावता हजारे, पांडुरंग रोडे, डॉ ईश्‍वर हजारे, तानाजी पवार, राहुल मासोळे, अनिल माने, नाना कोल्हे, राष्ट्रपाल आव्हाड, गणेश बोराटे, वैभव हजारे सह आदी उपस्थित होते.

वचननामा पूर्ततेची सुरूवात ः प्रशांत शिंदे – जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही जनतेला दिलेल्या वचननामा पूर्ततेची सुरुवात आ प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून केली आहे.  जवळा ग्रामसचिवालयासाठी 25 लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच मोठे काम जवळा गावात आणणार आहोत असे भाजपाचे युवा नेते प्रशांत शिंदे यांनी सांगितले .

COMMENTS