Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्राम्हणगाव ग्रामपंचायतवर कोल्हेंचेच वर्चस्व

अनुराग येवले लोकनियुक्त सरपंच

कोपरगाव - कोपरगाव तालुक्याच्या राजकीय सारीपाटावर महत्वाच्या समजल्या जाणार्‍या व संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या ब्राम्हणगाव ग्रामपंचायतची निवड

वांबोरी घाटात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटेना…
जामखेडमध्ये चोरट्यांनी डोके काढले वर
गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक जाहीर

कोपरगाव – कोपरगाव तालुक्याच्या राजकीय सारीपाटावर महत्वाच्या समजल्या जाणार्‍या व संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या ब्राम्हणगाव ग्रामपंचायतची निवडणूक अत्यंत चुरशीची होऊन कोल्हे गटाचे अनुराग प्रभाकर येवले यांनी काळे गटाचे रविंद्र पिंपरकर यांचा 1468 एवढ्या मोठ्या फरकाने पराभव करत नेत्यांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवत ग्रामपंचायतवर निर्विवाद वर्चस्व मिळवत कोल्हे गटाचा झेंडा लावला तर  काळे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत कोल्हे गट विरुध्द काळे गट असी लढत होऊन  पाच प्रभाग रचना व ग्रामपंचायतच्या तेरा सदस्यांसाठी 47 उमेदवार रिंगाणात होते तर सरपंच पदासाठी एका अपक्षासह तीन उमेदवार आपले नशिब आजमावित होते सरपंचपदासाठी खरी लढत कोल्हे गटाचे अनुराग प्रभाकर येवले व काळे गटाचे रविंद्र अशोक पिंपरकर यांच्यातच झाली यात अनुराग येवले यांना 2445 मते मिळाली रविंद्र पिंपरकर यांना 977 तर अपक्ष संजीव जगताप यांना 248 मते मिळाली यात कोल्हे गटाचे अनुराग येवले यांनी काळे गटाचे रविंद्र पिंपरकर यांचा 1468 मतांनी पराभव केला सदस्यांमध्ये निवडून आलेले उमेदवार कोल्हे गट ज्ञानदेव किसन जगधने, लहानबाई बाळू माळी, रंजना शांताराम बनकर, रावसाहेब भीमा शिंगाडे ,वनिता उर्फ नंदाबाई बाळासाहेब बनकर, कुसुम कारभारी बनकर, रेणुका विठ्ठल दोडके, संजय लहानु पवार, सुनिता मोतीराम शिंगाडे ,यमुनाबाई हरिभाऊ आसणे, संजय अशोक वाबळे, अनिता नानासाहेब जाधव तर काळे गटाचे एकमेव देविदास चांगदेव आसणे हे निवडून आले असुन प्रभाग 5 मधुन कोपरगांव  पंचायत समिती सदस्य तथा काळे साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्रावण निवृत्ती आसणे यांना पराभवास सामोरे जावे लागले त्यांचा पराभव हा काळे गटाला मोठा झटका मानला जातो त्यांचा पराभव पोलिस पाटील रविंद्र बनकर यांची चुलती कुसुम कारभारी बनकर यांनी 43 मतांनी केला विजयी लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले प्रतिक्रिया देताना म्हणाले की संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष  बिपीनदादा  कोल्हे मा.आमदार स्नेहलता कोल्हे ,युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांत ब्राम्हणगावची वेगळी ओळख करणार असुन जनतेचा सेवक म्हणूनच काम करणार असल्याचे सांगितले

COMMENTS