Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीवर विखे समर्थकांचा झेंडा

राहाता ः तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत नऊ ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय मिळवत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थ

जीएम औषधांवर बंदी का नाही? ; शेतकरी नेते घनवट यांचा सवाल, मंत्री जावडेकरांवर केली टीका
अविकासाच्या अपप्रवृत्तींचा नाशासाठी खड्डे रूपी रावणाचे दहन
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24

राहाता ः तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत नऊ ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय मिळवत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी आपला विजयाचा झेंडा फडकवला आहे, त्यामुळे तालुक्यात मंत्री विखे पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
राहाता तालुक्यात असणार्‍या परंतु कोपरगाव विधानसभा कार्यक्षेत्रात येणार्‍या पुणतांबा वाकडी व चितळी या ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाने बाजी मारत विरोधकांना पराभवाची धूळ चारली. येथे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तालुक्यातील निमगाव तसेच रुई येथे सत्ताधारी गटाला पुन्हा मतदारांनी कौल दिला असून विरोधकांच्या पदरी पुन्हा पराभव पडला आहे. रविवार 5 नोव्हेंबर रोजी 12 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते काल 6 रोजी राहाता तालुका प्रशासकीय इमारत येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा राहाता तहसीलदार अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा वाजता ईव्हीएम मशीन उघडून मतमोजणी सुरू झाली होती. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतचे निकाल हाती आले होते. सरपंच व सदस्य पदासाठीच्या उमेदवारांची निकालात दरम्यान धाकधूक वाढलेली दिसली. विजयी झाल्याचे समजताच बाहेर उभे असलेले कार्यकर्ते गुलालाची मुक्त उधळण करून एकच जल्लोष करत होते. शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसेच शिर्डीचे पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांच्या पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत वाकडी ग्रामपंचायत सरपंच पदी रोहिणी बाळासाहेब आहेर विजयी झाल्या आहेत. तर रुई ग्रामपंचायत शितल वाबळे 1 हजार 794 मते मिळवून सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. निर्मळ पिंपरी ग्रामपंचायतसाठी पूनम कांबळे 1 हजार 731 मते मिळवून सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. निमगाव कोर्‍हाळे ग्रामपंचायत निवडणुकीत 1 हजार 412 मते मिळून कैलास साहेबराव कातोरे सरपंचपदी विराजमान झाले आहेत. चितळी ग्रामपंचायत नारायण कदम 899 मते मिळवून सरपंचपदी विजयी झाले आहेत. दाढ बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत 1 हजार 966 मते मिळवून तात्यासाहेब सातपुते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. दहेगाव कोर्‍हाळे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी पुनम संदीप डांगे यांनी 860 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. धनगरवाडी ग्रामपंचायत मध्ये 516 मते मिळवून गोपीनाथ खरात सरपंचपदी विजयी झाले आहेत. दुर्गापुर ग्रामपंचायत सरपंच पदासाठी नानासाहेब फुलाटे 1 हजार 384 मते घेऊन विजयी झाले आहेत. कनकुरी ग्रामपंचायत करिता संगीता गोत्रिक्ष 612 मध्ये मिळून सरपंच पदी विराजमान झाल्या. कोर्‍हाळे ग्रामपंचायत निवडणुकीत 865 मते मिळवून पूजा झिंजुर्डे सरपंच झाल्या आहेत. आडगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत बाबासाहेब निवृत्ती माळी 369 मते मिळवून सरपंच झाले आहेत. पुणतांबा ग्रामपंचायत निवडणुकीत स्वाती पवार यांनी 3 हजार132 मते मिळवून सरपंच झाल्या आहेत.

COMMENTS