Homeताज्या बातम्यादेश

आयफोन हॅकिंग प्रकरणी केंद्राकडून तपास सुरू

नवी दिल्ली ः देशातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांना अ‍ॅपल कंपनीकडून तुमचा आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मेसेज धडकल्यामुळे संपूर्ण दे

हक्कभंग आणावा,माफी मागणार नाही-भास्कर जाधव | LOKNews24
खासगी शाळांचे प्रश्‍न सोडवा
अंगणवाडी सेविकांच चटणी भाकर आंदोलन

नवी दिल्ली ः देशातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांना अ‍ॅपल कंपनीकडून तुमचा आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मेसेज धडकल्यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर याप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. यामध्ये ’स्टेट-स्पॉन्सर्ड’ हॅकर्स त्यांचा आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. आता केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आयटी मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारताची कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम याबाबत तपास करणार असल्याचे आयटी सचिवांनी स्पष्ट केले. तसेच, अ‍ॅपल कंपनी या तपासात सहकार्य करणार असल्याचे देखील कृष्णन यांनी यावेळी सांगितले. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षातील आणि इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी आपले आयफोन सरकार हॅक करत असल्याचा आरोप केला होता. अ‍ॅपल कंपनीने त्यांना एक इशारा दिला होता, ज्यामध्ये म्हटले होते, की काही राज्य पुरस्कृत हॅकर्स त्यांच्या आयफोनला अ‍ॅक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. या मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट करत कित्येक नेत्यांनी याबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. इशारा मिळालेल्या व्यक्तींमध्ये केसी वेणुगोपाल, महुआ मोईत्रा, शशी थरुर, प्रियांका चतुर्वेदी, पवन खेरा, सीताराम येचुरी, अखिलेश यादव आणि राहुल गांधींच्या कार्यालयातील काही कर्मचारी यांचा समावेश होता.

COMMENTS