Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्तारोको

कर्जत : मराठा समाजास सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्

खर्डा आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा
जामखेडच्या राजकारणात धक्कातंत्र ;
शंकर भालेकर यांचे निधन

कर्जत : मराठा समाजास सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यास सकल मराठा समाज कर्जत तालुका यांच्या वतीने पाठींबा देत मंगळवारी कर्जत शहरासह तालुक्यात बंद ठेवण्यात आला. कर्जत येथे रास्ता रोको आंदोलन केले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आले.
कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन करत शासनाचा निषेध केला. यावेळी तहसीलदार जगदाळे आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील एसटी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मंगळवारी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज बांधवांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणाबाबत निषेध मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तीव्र भावना प्रशासनासमोर व्यक्त केल्या. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनास सकल मराठा समाज पाठींबा दर्शवत असून दोन्ही आमदारांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा देत आरक्षणासाठी मराठा समाजाच्या बांधवासोबत असल्याचे दाखवावे अशी मागणी केली. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी सकल मराठा समाज कर्जतचे प्रमुख समन्वयक वैभव लाळगे, अंबादास पिसाळ, श्रीहर्ष शेवाळे, शिवाजी फाळके, सुनील शेलार, उज्वला शेळके, विशाल मेहेत्रे, गंगाधर बोरुडे, राहुल नवले, गजेंद्र यादव, संपत पवार आदींची भाषणे झाली. रास्ता रोको दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

COMMENTS