जामखेड ः माणसांची मन, आचारण शूध्द असेल तरच विकास कामही शुद्ध होतात. सामाजिक विकास काय असतो हे समजण्यासाठी फक्त सत्तेचे, स्वार्थाचे राजकारण करणार
जामखेड ः माणसांची मन, आचारण शूध्द असेल तरच विकास कामही शुद्ध होतात. सामाजिक विकास काय असतो हे समजण्यासाठी फक्त सत्तेचे, स्वार्थाचे राजकारण करणार्यांनी चष्मा बदलावा असा सडेतोड सल्ला अजिनाथ हजारे यांनी दिला आहे. जवळा ग्रामपंचायतमध्ये शेतकरी ग्रामविकास आघाडी जवळा पँनलचा प्रचार शुभारंभ भव्य रँलीद्वारे करण्यात झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जवळा फाटा येथुन प्रचार रँलीची सुरुवात झाली. वाजत गाजत जवळा गावातुन जवळेश्वर मंदिरापर्यंत येऊन सभेत रूपांतर झाले. यावेळी शेतकरी ग्रामविकास आघाडीचे सर्व उमेदवार व ग्रामस्थ महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना हजारे म्हणाले की, सध्या दुष्काळाचे सावट आहे. सर्वांनी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याचा विचार संपुर्ण गावाने केला मात्र एका व्यक्तीने गावावर निवडणूक लादली. गावाचा विकास म्हणजे विज पाणी रस्ते एवढाच आहे का? असा माणसाच्या मना मनात राग द्वेष निर्माण केला मग असा विकास काय कामाचा? घराघरात भांडणे लावून स्वतःच्या स्वार्थासाठी गावावर निवडणूक का लावली याचा विचार करावा. आम्ही मानव रूपी सेतु बांधण्याचं व त्यांच्या विकासाचं काम सातत्याने करत आलो आहोत. असे शेतकरी ग्रामविकास आघाडीचे अजिनाथ हजारे यांनी सांगितले. सरपंचपदाचे उमेदवार बाळासाहेब श्रावण आव्हाड, सत्तार भाऊसाहेब, शिवदास लेकुरवाळे, डॉ दिपक वाळुंजकर, शहाजी पाटील, हुसेनभाई शेख, दशरथ हजारे, आशोक पठाडे, नय्युमभाई शेख आदींनी भाषणे केली. जवळा गावात राष्ट्रीयकृत बँकेची गरज आहे. उपबाजार समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र गावातील शाळांमधील सुविधा रस्ता पाणी आदी सुविधा गावाला देण्याबाबत वचनबद्ध आहोत असे सर्वांनीच सांगितले. यावेळी दत्तात्रय कोल्हे, डॉ. महादेव पवार, शहाजी पाटील, आर. डी. पवार, दिपक पाटील, राजेंद्र मोटे, चेअरमन मूंजाबा, प्रदीप दळवी, डॉ. दिपक वाळूंजकर, राजेंद्र राऊत, राजू महाजन, आयूब शेख, हूशेनभाई सय्यद, पांडुरंग वाळके, आदी उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सूरू असलेल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. तसेच जवळा गावातील तरूण किरण बोलभट यांचा आपघाती मृत्यू झाल्याने श्रध्दांजली वाहण्यात आली.
COMMENTS