Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीतील शिंदे गटाच्या 28 पदाधिकार्‍यांचे सामुहिक राजीनामे

देवळाली प्रवरा ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण

विनयभंग करणार्‍या अधिकार्‍यांना येरेकरांचा आशीर्वाद ?
दूध प्रश्‍नांवर कोतुळमध्ये आजपासून बेमुदत धरणे आंदोलन
अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार : वसंत लोढा

देवळाली प्रवरा ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या तब्बल 28 पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे पक्षाकडे पाठविले आहेत.मराठा आरक्षणासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांच्या राजीनाम्याने दिला धक्का बसला आहे. त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपोषणाची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी या पदाधिकार्‍यांनी केली आहे.
             संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राहुरी तालुक्यातील शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी राहुरी फँक्टरी येथिल खाजगी अतिथीगृहावर बैठक घेवून सामुहीक राजीनामा देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपोषणाची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी या पदाधिकार्‍यांनी केली आहे.    
                  यावेळी शिंदे सेना गटाचे पदाधिकारी सामुहीक राजीनामा देणार्‍या मध्ये उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब म्हसे, जयवंत पवार यांच्यासह अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत महाराज जाधव, जिल्हा उपाध्यक्ष गोरक्षनाथ रामफळे, दक्षिण उप जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत कर्डिले, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शाम गोसावी यांच्यासह शेतकरी सेना तालुकाप्रमुख किशोर मोरे, शिवसेना अध्यात्मिक आघाडी श्रीरामपूर तालुकाप्रमुख वसंत खरात, नेवासा तालुकाप्रमुख सोमनाथ महाराज पाटील, राहुरी तालुकाप्रमुख बाळासाहेब मुसमाडे, किरण देशमुख, पारनेर तालुकाप्रमुख अनिल टेकूडे, अकोले तालुकाप्रमुख तुकाराम आरोटे, शेवगाव तालुकाप्रमुख कल्याण महाराज काळे, राहाता तालुकाप्रमुख संतोष दीक्षित, कोपरगाव तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत कर्डिले, नगर तालुकाप्रमुख राजराजेश्‍वर शास्त्री, श्रीगोंदा तालुकाप्रमुख अक्षय मोरे, संगमनेर तालुकाप्रमुख दिलीप पवार यासह 28 पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. मराठा आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा आंदोलक यांनी आंदोलन सुरु केले आहे. परंतू राजकीय पदाधिकार्‍यांनी पदाचे राजीनामे दिल्यानंतरच आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. त्यानुसार सकल मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी यांनी राजीनामे देण्यास सुरवात केली आहे.

COMMENTS