Homeताज्या बातम्यादेश

भाजप आमदारांची पत्नी 24 तासांपासून बेपत्ता

लखनऊ ः उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता झाली आहे. या घटनेला 24 तास उलटून गेले आहेत. सुलतानपूरच्या लंभुआ विधानसभा मतद

शेअर बाजार पुन्हा कोसळला; सेन्सेक्स हजार अंकांनी घसरला
भारत न्याय यात्रेला होणारा विरोध
कॉ. बाबा आरगडे गौरव ग्रंथ प्रकाशित करणार

लखनऊ ः उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता झाली आहे. या घटनेला 24 तास उलटून गेले आहेत. सुलतानपूरच्या लंभुआ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीताराम वर्मा यांच्या पत्नी मंगळवारी सकाळी सहा वाजता कामानिमित्त घरातून बाहेर पडल्या होत्या. तेथून त्या परतल्याच नाहीत. या प्रकरणी त्यांचा मुलगा पंकज यानं गाजीपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला आहे. आमदार वर्मा यांच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी लखनऊ पोलिसांनी सहापेक्षा जास्त पथके नेमली आहेत. तर सर्व्हिलान्स टीमसह सायबर सेलही सक्रिय झाला आहे.

COMMENTS