Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मद्यपी वाहन चालका विरूद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : मादक द्रव्य पिऊन वेड्या वाकड्या रितीने व लोकांच्या जिवितास धोका निर्माण होईल अशा रितीने वाहन चालवणाऱ्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली

संजीवनीच्या चार विद्यार्थ्यांची परदेशात निवड – अमित कोल्हे
रेन्बो स्कूलमध्ये खो-खो स्पर्धांना सुरुवात
कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ३८ हजार ग्राहकांना नोटिस

अहमदनगर : मादक द्रव्य पिऊन वेड्या वाकड्या रितीने व लोकांच्या जिवितास धोका निर्माण होईल अशा रितीने वाहन चालवणाऱ्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई नगर पुणे रोडवरील कायनेटिक चौक येथे केली.

 या बाबतची माहिती अशी की कोतवाली पोलिस हे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे नगर रोड कायनेटीक चौक येथे नाकाबंदीची ड्युटी करत असताना एक इसम त्याचे ताब्यातील वाहन हे वेड्यावाकड्या रितीने व लोकांच्या जिवितास धोका निर्माण होईल अशा रितीने चालविताना दिसल्याने त्यास त्याची होंडा शाईन मोटार सायकल (क्रमांक एम एच 16 बी एन 5759) सह थांबवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रकाश गंगाराम बुलाखे (रा. औसरकर मळा नानाजी मळा सारसनगर, अ.नगर) असे असल्याचे सांगितले. त्याने काहीतरी मादक द्रव्य सेवन केल्याचा त्याचा वास येत असल्याने चालकाची सिव्हील हॉस्पिटल येथे तपासणी केली असता.तो मादक द्रव्याचे आमलाखाली असल्याचा वैदयकिय अधिकरी यांनी लेखी अभिप्राय दिला आहे.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत खताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाहन चालकाविरुध्द भा द वि कलम 336, सह मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS