Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रातील मराठी माणसाचा कणा मोडलेला का?

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांचा सवाल

श्रीगोंदा ः राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची प्रेरणा शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर हे महापुरुष आहेत आणि हे सर्वजण महाराष्

कर्जतमध्ये बोगस डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍यास सक्तमजुरी
LOK News 24 । छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

श्रीगोंदा ः राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची प्रेरणा शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर हे महापुरुष आहेत आणि हे सर्वजण महाराष्ट्रात होऊन गेले. आपल्याकडे एवढी प्रेरणा असताना मराठी माणसाचा कणा का मोडलेला आहे ? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उपस्थित केला.
यावेळी पार पडलेल्या मेळाव्यामध्ये प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांनी प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते अरविंद कापसे यांची संघटनेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर केली. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल ढवळे, जिल्हा संघटक गणेश पाटे, जिल्हा सचिव हेमंत हिरडे, कर्जत तालुकाध्यक्ष नवनाथ धनवे, पारनेर तालुकाध्यक्ष तुषार मोटे, श्रीगोंदा शहराध्यक्ष मेजर विजय वाघमारे यांची निवड करण्यात आली. या सोहळ्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, प्रदेश संघटक अजयसिंह सावंत, प्रदिप कणसे, सचिन सावंत देसाई, श्याम पाटील, नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र दातीर, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख, कोकण विभाग अध्यक्ष सुभाष सावंत, माजी जिल्हाध्यक्ष गोरख दळवी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी गायकवाड म्हणाले की, मराठा समाजाची सद्यस्थिती आणि त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. संभाजी ब्रिगेडने आरक्षणाचा विषय सोडला नाही या मुद्यावर जोर देताना त्यांनी सांगितले की 1 जून 2004 च्या शासननिर्णयानुसार मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते. तसेच 102 व्या घटनादुरुस्तीने आलेल्या खुल्या वर्गातील 10% आर्थिक दुर्बल घटकांच्या सवलतीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येच्या मार्गाला न जाता या पर्यायांचा विचार करावा. संभाजी ब्रिगेड सध्या अर्थकारणाची चळवळ उभा करण्याचे काम करत असून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा मानून ’अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातुन परदेशातील नोकरी व्यवसायाच्या संधींची ओळख करून देणे, त्यासाठी मार्गदर्शन करणे असे उपक्रम राबवले जातात. या माध्यमातून आठ हजारांहून अधिक तरुणांना परदेशात नोकरी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरक्षणाने सर्व प्रश्‍न सुटणार नसल्याने तरुणांचे आर्थिक सक्षमीकरण करणे देखील तितकेच गरजेचे आहे, असे मत यावेळी त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील ढवळे यांनी केले, तर आभार नानासाहेब शिंदे यांनी मानले.

COMMENTS