Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खर्डा दसरा महोत्सवाला आंतरराष्ट्रीय कलाकारांची हजेरी

आमदार रोहित पवारांचा पुढाकार ; ‘लेझर शो‘ हे प्रमुख आकर्षण

जामखेड ः ऐतिहासिक खर्डा येथे शिवपट्टण किल्ल्यावर कर्जत-जामखेडमधील नागरिक आणि आमदार रोहित पवार यांच्यावतीने ‘भव्यदिव्य दसरा महोत्सव 2023‘चे आयोजन

रोहित पवारांच्या कारखान्याला साडेचार लाखाचा दंड
रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची विधीमंडळात चर्चा
कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवारांचे आंदोलन

जामखेड ः ऐतिहासिक खर्डा येथे शिवपट्टण किल्ल्यावर कर्जत-जामखेडमधील नागरिक आणि आमदार रोहित पवार यांच्यावतीने ‘भव्यदिव्य दसरा महोत्सव 2023‘चे आयोजन शनिवारी 21 रोजी सायंकाळी करण्यात आले होते. या दसरा उत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवात नागरिकांना केरळ पंजाब कँनडा अशा अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलाकारांची कला पहाण्याची संधी नागरिकांना मिळाली.
यामध्ये खर्डा येथील भगव्या स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने झालेला ‘लेझर शो‘ हे प्रमुख आकर्षण ठरला.  हा लेझर शो ‘दुबई इंटरनॅशनल शो‘ तसेच ‘अयोध्या दीपोत्सव‘ सह देशातील विविध राज्यातील मोठमोठ्या कार्यक्रमात दाखवण्यात आलेला होता. तब्बल 8-10 किलोमीटरवरूनही हा शो पाहता येत होता.. त्याचबरोबर केरळ येथील प्रसिद्ध डान्स ग्रुपचा ‘शबरी चेंडे डान्स‘ देखील नागरिकांच्या पसंतीस उतरला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्रदीपक व आकर्षक विद्युत रोषणाईने खर्डा किल्याची सजावट करण्यात आली होती. पंजाबमधील ‘वीर खालसा ग्रुप‘ने ‘गटका‘ या पारंपारिक खेळाबरोबर अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. अमेरिकेतील ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट‘ या शोचे विजेतेपदही पटकावले आहे. याचबरोबर ‘कोल्हापुरी मर्दानी खेळ‘ या संघाने शिवकालीन व युद्ध कलेची प्रात्यक्षिके सादर केली. याबरोबरच जगातील प्रसिद्ध असलेल्या कॅनडा आणि स्पेन येथील ध्वनी यंत्रणा वाजवली गेली. नागरिकांना 4 दिवस विविध कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेता आला. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम मतदारसंघात राबवले जातात अशातच या देखील दसरा महोत्सवाच्या अनोख्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

COMMENTS