छ.संभाजीनगर ः गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गावर सुरू असलेली अपघाताची मालिका अजूनही सुरूच असून, रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल
छ.संभाजीनगर ः गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गावर सुरू असलेली अपघाताची मालिका अजूनही सुरूच असून, रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात तब्बल 12 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये लहान बालकाचा देखील समावेश आहे. सैलानी येथील दर्गावरून परतणार्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली. या अपघातामध्ये एकाच कुटूंबातील तिघांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
बुलडाण्याहून नाशिकला जाणार्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 23 जण जखमी झाले आहेत. या टेम्पो ट्रॅव्हरलमध्ये एकूण 35 प्रवासी होते. या टेम्पो ट्रॅव्हलरने प्रवास करणारे सर्व प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रवासी बुलडाण्यातील बाबा सैलानींच्या दर्शनाला गेले होते. तिथून घरी परतत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. दरम्यान, घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने मतदकार्य सुरू असून अपघातात जखमी झालेल्या 23 प्रवाशांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे काहींनी सांगितले. तर जखमी प्रवाशांनी दावा केला आहे की, पोलिसांनी एका ट्रकला थांबवले होते. हा ट्रक रस्त्याकडेला उभा होता. ट्रकचालक तिथून ट्रक काढत असताना टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. मध्यरात्री झालेल्या या अपघातामध्ये ठार झालेल्या 12 जणांपैकी राजीव नगर वसाहतीमधील चौघांचा समावेश आहे. त्यात एकाच घरातील तिघांचा समावेश आहे. झुंबर काशिनाथ गांगुर्डे व 58 वर्ष, अमोल झुंबर गांगुर्डे वय 18 वर्षे, सारिका झुंबर गांगुर्डे वय 40 वर्ष राहणार राजू नगर नाशिक अशी एका कुटूंबातील मृतांची नावे आहेत. तर या अपघातामध्ये एका लहान मुलाने आपले आई-वडील गमावले. तो रडून रडून आई-वडिलांना बोलवत होता. या लहान मुलाची बिकट स्थिती झाली होती.
समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनी एक ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते. त्याच वेळेस मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर तत्काळ वाहतूक पोलीस प्रशासनाने मदतकार्य सुरु केले. रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
समृद्धीवरील वाहतूक थांबवावी ः वडेट्टीवार – समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सातत्याने सुरूच असल्यामुळे अपघाताची ही मालिका रोखण्यासाठी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. समृद्धीचे काम अर्धवट असताना एन्ड टू एन्ड सर्व सुविधा सुरू झाल्यानंतर हा रस्ता सुरू करण्याची गरज होती. त्या मार्गावर रेस्ट रूम नाही, समृद्धीत भ्रष्टाचारानेच झाला हे कोणी नाकारू शकत नाही. महामार्गाचे काम घाई गडबडीत करण्यात आले आहे. त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे. हे अपघात सरकारच्या घाईमुळे होत आहेत. यात तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे समृद्धीची वाहतूक थांबवावी, समृद्धी सुरू ठेवायचा की नाही यावर विचार झाला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे.
COMMENTS