Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजी वाळके यांना शब्दगंध उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

देवळाली प्रवरा ः शब्दगंध साहित्यिक परिषद व अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात रा

मढी येथील यात्रेसाठी सर्वांनी जबाबदारी उचलावी
भेंडा गोळीबारातील जखमीच्या छातीतील गोळी काढण्यात यश
गोळीबाराने कर्जत प्रांत कार्यालय हादरले

देवळाली प्रवरा ः शब्दगंध साहित्यिक परिषद व अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात राज्यस्तरीय शब्दगंध उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार देवळाली प्रवरा नगर परिषदेचे श्री त्रिंबकराज मोफत वाचनालयाचे ग्रंथपाल संभाजी वाळके यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
          कविवर्य पद्मश्री ना. धो. महानोर साहित्यनगरी पंडित गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय प्रांगणात पार पडला.शब्दगंधा साहित्य परिषदेच्या वतीने यावर्षीचा राज्यस्तरीय शब्दगंध उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार देवळाली प्रवरा नगर परिषदेचे श्री त्रिंबकराज मोफत वाचनालयाचे ग्रंथपाल श्री संभाजी वाळके यांना संमेलन अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, स्वागत अध्यक्ष आमदार संग्राम भैय्या जगताप, प्रमुख पाहुणे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक बी. जी. शेखर, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक, सुनील गोसावी यांच्या उपस्थितीत बी. जी. शेखर पती पत्नी यांच्या हस्ते संभाजी वाळके यांना सपत्नीक शाल ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
                यावेळी अ‍ॅड. सुनील हरिश्‍चंद्रे, अ‍ॅड गणेश मोरे, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव रणसिंग, अनिल देशमुख साहेब, टेक्नोटाईम कॉम्प्युटर सिस्टीम चे संचालक नरहरी अंबिलादे, खडांबे येथील सोसायटीचे चेअरमन  भाऊसाहेब जाधव, खडांबे येथील प्रगतशील शेतकरी दिनकर गायके, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे विजय साठे, सुदाम कडू, भास्कर जाधव, दत्तात्रय होले व सागर होले, अप्पासाहेब कडू, महेश कडू ,उत्तम वाळके, जयश्री वाळके, वैष्णवी वाळके सोनाली मोरे, तसेच देवळाली प्रवरा यांच्या उपस्थित पार पडला.

COMMENTS