Homeताज्या बातम्यादेश

हरियाणातील पाच मित्रांचा अपघातात मृत्यू

चंदीगढ ः भरधाव वेगात येणार्‍या ट्रकने बलेनो कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये 5 जिवलग मित्रांसह ट्रकमधील क्लिनरचा जागीच मृ

विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात
Buldhana : बुलढाण्यात भीषण अपघात…ट्रक व बस जळुन खाक (Video)
एक्सप्रेसवर कंटेनरचा झाला ब्रेक फेल

चंदीगढ ः भरधाव वेगात येणार्‍या ट्रकने बलेनो कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये 5 जिवलग मित्रांसह ट्रकमधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना हरियाणातील भिवानी जिल्ह्यात घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे.  प्रदीप (वय 30, रा. लडियानली), रवी (वय 22, रा. इंदिवली गाव), जितेंद्र (वय 30, रा. नारनौंड), विकास (वय 28) आणि नसीब (वय 27, रा. बुडेडा गाव) अशी मृत्युमुखी पडलेल्या मित्रांची नावे आहेत. तर ट्रकमधील क्लिनरची ओळख अद्याप पटलेली नाही. स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

COMMENTS