Homeताज्या बातम्यादेश

पाच राज्यात रणधुमाळी सुरू

निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा

आम् आदमी पार्टीची बैठक उत्साहात संपन्न
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संकुल विद्यार्थांचे पिंचाक सिलेक्ट  मध्ये व घवघवीत यश
टिटवी येथे बंजारा परंपरेतील तीज सण उत्साहात 

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  याबाबतची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
या पाच राज्यांतील विधानसभेची मुदत संपत असून, त्याआधीच निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. तर मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे.  मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान 7 नोव्हेंबर घेतली जाणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. 7 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर 17 नोव्हेंबरला दुसर्‍या टप्प्यातील मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेश- 17 नोव्हेंबर, राज्यस्थान 23 नोव्हेंबर आणि तेलंगणात 30 नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. 5 डिसेंबरपर्यंत या पाच राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 2023 च्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 679 विधानसभा मतदारसंघात सुमारे एक लाख 77 हजार मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. शिवाय पाच राज्यांच्या 940 हून अधिक आंतरराज्य सीमेवरील चेक पोस्ट्सवर बेकायदेशीर रोकड, दारू, मोफत वस्तू आणि ड्रग्ज वाहतुकीच्या कोणत्याही सीमापार हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास आम्ही सक्षम आहोत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
दरम्यान, या पाचही राज्यांमध्ये सत्ताधारी विरूद्ध काँगे्रस असा सामना रंगणार आहे. यातील राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँगे्रसची सत्ता आहे. तर दुसरीकडे भाजप याठिकाणी कडवी झुंज देण्याची शक्यता आहे. तर, मध्यप्रदेशमध्ये भाजपची सत्ता असून, ही सत्ता टिकवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल, यात शंकाच नाही. तर दुसरीकडे तेलंगणामध्ये केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती सत्तेत आहे. त्यामुळे काँगे्रस विरूद्ध भाजप असा सामना येथे बघायला मिळण्याची शक्यता कमीच आहे.

कोणत्या राज्यात किती मतदार ?
मध्य प्रदेश – 5.6 कोटी
राजस्थान – 5.25 कोटी
तेलंगणा – 3.17 कोटी
छत्तीसगड – 2.03 कोटी
मिझोराम – 8.52 लाख

राज्यनिहाय मतदान केंद्र
मध्यप्रदेश – 64,523 मतदान केंद्र
राजस्थान – 51,756 मतदान केंद्र
छत्तीसगड- 24,109 मतदान केंद्र
तेलंगणा – 35,356 मतदान केंद्र
मिझोरम – 1272 मतदान केंद्र

या दिवशी होणार मतदान
मिझोराम- 7 नोव्हेंबर
मध्यप्रदेश- 17 नोव्हेंबर
छत्तीसगड- 7 व 17 नोव्हेंबर
राजस्थान – 23 नोव्हेंबर
तेलंगाणा- 30 नोव्हेंबर

COMMENTS