Homeताज्या बातम्यामनोरंजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर येणार सिनेमा

मुंबई प्रतिनिधी - भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आयुष्य जनतेला रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. देशातील बड्या राजक

राज्याची विजेची गरज जर्मनीपेक्षा अधिक होणार: सचिव आभा शुक्ला
अवैध गर्भपातामुळे मृत्यूची विशेष पथकामार्फत चौकशी
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी केवळ 31.74 टक्के मतदान

मुंबई प्रतिनिधी – भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आयुष्य जनतेला रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. देशातील बड्या राजकारण्यांपैकी एक नेता म्हणून नितीन गडकरी यांची ओळख. सक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्त्व, सडेतोड भूमिका, नव्या भारतासाठी दूरदृष्टी ठेवून धडाकेबाज निर्णय घेणारे राजकारणी नेते अशी त्यांची ओळख आपण अनेकदा पाहिली आहे.

भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.‘गडकरी’ चित्रपटामध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार ? अद्याप ही माहिती गुलदस्त्यात आहे. या प्रमुख भूमिकेत कोणता कलाकार असेल, सध्या याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

COMMENTS