Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवनाथ चावरे यांचे भाजपचे जिल्हाध्यक्षांकडून सांत्वन

जळका/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील जळका येथील शिवनाथ ज्ञानदेव चावरे यांची भाची सुजाता यांचे दिनाक 21 सप्टेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले असल्या क

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क ढीगभर घाण | पहा ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24
नगर मनमाड महामार्गावरील खड्डे बुजवून अवजड वाहतूक बंद करा
संत ज्ञानेश्‍वर शाळेच्या100 टक्के निकालाची परंपरा कायम

जळका/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील जळका येथील शिवनाथ ज्ञानदेव चावरे यांची भाची सुजाता यांचे दिनाक 21 सप्टेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले असल्या कारणाने भाजपचे उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष. विठ्ठलराव लंघे पाटील तसेच नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटिल यांनी चावरे कुटूंबियांना सांत्वन भेट दिली. चावरे व लबडे कुटूंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखातुन परमेश्‍वर त्यांना सावरण्याची शक्ती देवो व या कुटूंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशी ग्वाही मुरकुटे व लंघे यांनी दिली. या प्रसंगी रामेश्‍वर तनपुरे, श्रीकांत भागवत, इंजिनीअर संग्राम गायकवाड, डाँ. महेश विधाटे यांच्यासह चावरे कुटुंबिय व नातेवाईक उपस्थित होते.

COMMENTS