पुणे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करा : अजित पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करा : अजित पवार

पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी बृहत आराखडा तयार करुन जिल्हा परिषदेकडून निश्चित करण्यात आलेल्या 406 पर्यटन स्थळांचा अभ्यास करा, तिथे कोणकोणत्या सुविधा उभा करता येतील यावर विचार करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पर्यटन विकासाच्या आढावा बैठकीत केल्या. 

LokNews24 l राज्यातील प्रकरणावर मुख्यमंत्री बोलत का नाही?
पुण्यातील 11 तालुके दुष्काळी घोषित
साहित्यसखी’द्वारा निफाड आश्रमशाळेत गुरुपोर्णिमा साजरी

पुणे : पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी बृहत आराखडा तयार करुन जिल्हा परिषदेकडून निश्चित करण्यात आलेल्या 406 पर्यटन स्थळांचा अभ्यास करा, तिथे कोणकोणत्या सुविधा उभा करता येतील यावर विचार करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पर्यटन विकासाच्या आढावा बैठकीत केल्या. 

यावेळी खासदार श्रीमती सुप्रियाताई सुळे, ॲड. वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, ॲड. अशोक पवार, आ.संजय जगताप, आ.सुनिल टिंगरे, आ.सुनिल शेळके, आ.चेतन तुपे, आ.सिध्दार्थ शिरोळे, आ.दिलीप मोहिते तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने निधी दिला आहे त्याचे नियोजन करा. पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करा. पर्यटन विकासासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कार्यशाळा घेऊन तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन घ्या असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, खासदार वंदना चव्हाण आणि सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने सुरु होणारा हा प्रकल्प स्तुत्य असून त्याबाबतीत जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. परंतु काम लोकांच्या सुविधेत भर पाडणारे व दर्जेदार असावे. पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी पार्कींग व्यवस्था असावी. तसेच पर्यटनाच्या ठिकाणी चुकीचे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. जुन्नर तालुक्याप्रमाणे अन्य तालुके पर्यटनस्थळे घोषित होण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही ते पुढे म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील 406 पर्यटन स्थळांच्या जमिनीची मालकी व कार्यरत मनुष्यबळ, लोणावळा येथील नियोजित नावीन्यपूर्ण पर्यटन उपक्रम, पिंपरी चिंचवडमधील पर्यटन स्थळे, किल्ले सिंहगड विकास, भीमाशंकर येथील अतिक्रमण धारकांसाठी  अल्पोपहार केंद्र उभारणी, अतिक्रमण धारकांसाठी केलेली प्रस्तावित उपाययोजना, पुरातत्त्व विभाग, जिल्ह्यातील विशेष पर्यटन क्षेत्र, महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन विकास, कृषी पर्यटन, पर्यटनातून रोजगार निर्मिती, गड किल्ले पर्यटन विकास आदींबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पर्यटन विकास, पुरातत्व  विभाग, जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.

COMMENTS