मुंबई ः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादान दानवे आणि शिवसेना खासदार संजय

मुंबई ः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादान दानवे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे दोघांवर विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहिले आहे. संजय राऊत आणि अंबादास विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकण्यासाठी सातत्याने वक्तव्ये करत आहेत. त्यांची विधाने राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असे नितेश राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
COMMENTS