नगरला मिळणार रोज 117 दशलक्ष लिटर पाणी ; अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरला मिळणार रोज 117 दशलक्ष लिटर पाणी ; अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात

मागील 8-9 वर्षांपासून दिवसाआड पाणी मिळणार्‍या नगर शहरात लवकरच रोज पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. सध्या रोज मिळणारे 73 दशलक्ष लिटर पाणी अमृत योजनेचे काम झाल्यावर रोज 117 दशलक्ष लिटर मिळणार आहे.

आई भवानी माता कोरोनाचे संकट टळू दे-महापौर शेंडगे
श्रीगोंदा बाजार समितीच्या सभापतीपदी अतुल लोखंडे
एस टी बस मधून महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

अहमदनगर/प्रतिनिधी- मागील 8-9 वर्षांपासून दिवसाआड पाणी मिळणार्‍या नगर शहरात लवकरच रोज पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. सध्या रोज मिळणारे 73 दशलक्ष लिटर पाणी अमृत योजनेचे काम झाल्यावर रोज 117 दशलक्ष लिटर मिळणार आहे. सुमारे 40 दशलक्ष लिटर जास्त मिळणारे पाणी नगरकरांची पाणीटंचाईची समस्या कायमस्वरुपी मिटवून जाणार आहे. 

    नगर शहरात केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून 107 कोटी रुपये खर्चून नवी पाणी योजना होत आहे. याशिवाय 116 कोटी रुपये खर्चाच्या फेज-2 योजनेचे मागील 11 वर्षांपासून सुरू असलेले कामही अंतिम टप्प्यात आले आहे. या योजनेतून शहरभर अंथरलेल्या पाईपलाईनच्या जाळ्यांतून आता अमृत योजनेतून मिळणारे पाणी वितरित होणार आहे. परिणामी, शहरवासियांना मुबलक पाणी मिळणार आहे. मुळा धरण ते नगर शहर असे एकूण 34 किलोमीटरपर्यंतचे अमृत पाणी योजनेचे पाईप टाकण्याचे काम सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्याचे काम झाले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशनपर्यंत अमृत पाणी योजनेचे पाणी येणार आहे. त्यानंतर काही दिवसात विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडीपर्यंतच्या पाईपलाईनचे कामही पूर्ण होणार आहे. अमृत पाणी योजनेच्या या दोन्ही टप्प्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण शहराला फेज-2 पाणी योजनेद्वारे पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नगर शहराचा पुढील चाळीस वर्षाचा पाणीप्रश्‍न यामुळे मार्गी लागणार आहे. सध्या नगर शहराला रोज 73 दशलक्ष लिटर पाणी मिळत असून हे काम पूर्ण झाल्यानंतर 117 दशलक्ष लिटरपाणी मिळणार आहे. वसंत टेकडी येथे अमृत योजनेमधून 50 लाख लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचे काम पूर्ण झाले असून याद्वारे नगर शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे तसेच वसंत टेकडी येथील जुन्या 67 लाख लिटर पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीचे कामही हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पाण्याची गळती बंद होऊन पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे.

अडचणी झाल्या दूर

अमृत पाणी योजनेच्या कामांमध्ये विविध अडचणी आल्या होत्या. यामध्ये शेतकरी, भूसंपादन, वन विभाग, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु आता त्या पूर्णपणे निकाली लागल्या असल्याने कामाला गती मिळाली आहे.

COMMENTS