मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्
मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे चित्र आहे. अजित पवार गटाने आता थेट सुप्रिया सुळेंवर निशाणा साधतांना म्हटले आहे की, खासदार सुप्रिया सुळे यांना दिल्लीत साधा एक नगरसेवकही निवडून आणता आला नाही, अशा शब्दात अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यासह देशात खळबळ उडाली. यानंतरही दोन्ही गटांकडून फारशी तिखट प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आता अजित पवार गटातील नेत्यांनी सुप्रिया सुळेंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
उमेश पाटील म्हणाले की, सुप्रिया सुळे या उत्कृष्ठ संसदपटू आहेत. त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे इंग्रजी आणि हिंदीवर प्रभुत्व आहे, याचा त्यांनी पक्षवाढीसाठी काहीच फायदा केला नाही असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे. खासदार सुप्रिया सुळे या उत्कृष्ठ संसदपटू आहेत, त्यांना अनेकदा संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो आहे. त्यांचे हिंदी आणि इंग्रजीवर असलेले प्रभुत्व आहे. त्यांच्या भोवती शरद पवार नावाचे जे वलय आहे तरी देखील त्यांना दिल्लीमध्ये 1 ही नगरसेवक निवडून आणता आला नाही. त्यांच्या या सर्व बाबींचा विचार करता त्या वर्षांतील 180 दिवस दिल्लीत राहतात तर किमान पक्ष संघटना इथेतरी बळकट असायला हवी होती असे म्हणत उमेश पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. दिल्लीत साधा एक नगरसेवक निवडून आला नाही, असे म्हणत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. उमेश पाटील म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही सांगायचे. राष्ट्रीय पातळीवर कुठेतरी मिझारोम, त्रिपुरा इथे त्यांच्या पातळीवर खासदार पक्षाचे चिन्ह घेऊन निवडून येणार, केरळमध्ये 1-2 आमदार येणार. गोव्यात पक्ष संपून गेला. महाराष्ट्रात हेलफाटे मारत बसण्यापेक्षा देशभर फिरून पक्ष वाढवला असता तर आज पक्ष खूप मोठा झाला असता. माझे पक्षावर प्रेम आहे म्हणून मला वाटते. ज्यांचे व्यक्तिमत्व राष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्ह आहे, शरद पवार नावाचा पाठिंबा आहे. इतके असूनही देशभरात पक्ष वाढू शकला नाही त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल पाटलांनी उपस्थित केला आहे. उमेश पाटील पुढे बोलताना म्हणाले की, गोवा, गुजरात, मिझारोम, नागालँड, बिहार याठिकाणी अजित पवारांनी जाऊन पक्ष वाढवायचा का? अजित पवार एकटे राज्य सांभाळायला सक्षम होते. परंतु अजित पवारांनी कष्ट केल्यानंतर यांना डोके लावायचे होते म्हणून आज ही वेळ आली आहे.
COMMENTS