Homeताज्या बातम्यादेश

चांद्रयानानंतर आता समुद्रयान मिशन!

भारताकडून मोहिमेची तयारी जोरात

नवी दिल्ली प्रतिनिधी - पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करून पुढील मिशन समुद्रयान असल्याचे सांगितले. चेन्नईच्या नॅश

15 हजारची लाच स्विकारल्या प्रकरणी गटविकास अधिकार्‍यासह शिक्षकास अटक
महाआयटीच्या कामावरून आमदार तांबे आक्रमक
ऑडीची नवीन इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च

नवी दिल्ली प्रतिनिधी – पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करून पुढील मिशन समुद्रयान असल्याचे सांगितले. चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजीत हे बनवले जात आहे. यामाध्यमातून ३ मानव समुद्राच्या ६००० मीटर खोलीत पाठवले जाईल. जेणेकरून तेथील स्त्रोत आणि जैव विविधतेची स्टडी करता येऊ शकते. मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं की, या प्रोजेक्टमुळे समुद्राच्या इकोसिस्टमवर कुठलेही नुकसान होणार नाही. हे एक डीप मिशन आहे, ज्यातून ब्ल्यू इकोनॉमी विकसित करण्यावर भर दिला जाईल. समुद्रातील खोलीत काय दडलंय हे शोधता येईल. यातून अनेकांना रोजगार मिळेल. कारण समुद्रातील संसाधनांचा वापर करता येऊ शकतो. एकीकडे ISRO चंद्रयान ३, गगनयान आणि सूर्य मिशनसारखे अंतराळ मिशन साध्य करत आहे. तर दुसरीकडे भारत आता समुद्रातील खोलीत काय दडलंय त्याचा शोध घेत आहे. NIOT मत्स्य ६००० आधी एक पर्सनल स्फेअर यान बनवले होते. जे ५०० मीटर समुद्राच्या खोलीपर्यंत जाऊ शकते. पर्सनल स्फेअरमध्ये एक व्यक्ती बसण्याची क्षमता होती. हे २.१ मीटर व्यास असलेली गोलाकार पाणबुडी होती. जी माइल्ड स्टीलपासून बनवली होती. त्याची चाचणी बंगालच्या खाडीत सागर निधी जहाजातून केली होती. जेव्हा हे मिशन यशस्वी झाले तेव्हा समुद्रयान प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

COMMENTS