Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ

मुंबई: गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे एसटी क

दोन मुलींना कंबरेला बांधून विवाहितेची आत्महत्या
समन्यायी कायद्याबाबत आम्ही भांडत होतो तेव्हा ‘ते’ का गप्प होते – ना.थोरात
आई राजा उदे उदेच्या गजराने राशीन, कुळधरण दुमदुमले !

मुंबई: गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे एसटी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल.  त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचार्‍यांना 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.

COMMENTS