Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपयशावर मात करून ध्येय साध्य करावे ः प्रा. रामचंद्र राऊत

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः जीवन जगत असताना अपयश आले तरी अपयशाने खचून न जाता अपयशावर मात करून जो आपले ध्येय साध्य करतो तोच जीवनात खर्‍या अर्थाने यशस्व

पेट्रोल -डिझेल गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची एक कोटी स्वाक्षरी मोहीम सुरू
ब्राम्हणगावमध्ये रंगला ‘होम मिनिस्टर’ चा खेळ
अमृतवाहिनी ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः जीवन जगत असताना अपयश आले तरी अपयशाने खचून न जाता अपयशावर मात करून जो आपले ध्येय साध्य करतो तोच जीवनात खर्‍या अर्थाने यशस्वी होतो असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राध्यापक, पत्रकार आणि लेखक प्रा. रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत यांनी केले. श्रीरामपूर नगर परिषद, लोकमान्य टिळक वाचनालय व सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी प्रा. रामचंद्र राऊत बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीरामपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब भांड यांनी भूषविले होते.
     जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय, प्रयत्न आणि आत्मविश्‍वास या तीन गोष्टी महत्त्वाच्या असून अभ्यासासाठी वाचन, चिंतन आणि मनन सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आई, वडील व शिक्षक यांचे योग्य मार्गदर्शन व आशीर्वाद पाठीशी असेल तर मनुष्य जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी प्रा. राऊत यांनी सांगितले. श्रीरामपूर नगर परिषद, श्रीरामपूर तसेच लोकमान्य टिळक वाचनालय व सांस्कृतिक विभाग तसेच स्वच्छता आणि आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय वाचन दिन, वाचन आठवडा व वाचन महिना आणि माझी वसुंधरा अभियान 4.0 आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा- जिज्ञासात्मक प्रश्‍नोत्तरे, निबंध, वाचन, चित्रकला आणि वादविवाद स्पर्धेत यशस्वी झालेल्या आणि दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवान विद्यार्थ्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्वश्री प्रा. रामचंद्र राऊत, पत्रकार बाळासाहेब भांड, प्रशासकीय अधिकारी धनंजय कविटकर, ग्रंथपाल स्वाती पुरे, शहर समन्वयक प्रमोद चव्हाण, राहीन शेख, राम सरगर, अमोल लांडे, रावसाहेब घायवट, किरण वागस्कर, अनंत शेळके, मनोज ईश्‍वरकट्टी, पुरण धांडे, हेमंत कार्ले, धनश्री पाटील यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके व भेट वस्तू प्रदान करण्यात येवून त्यांचा गौरव करण्यात आला. श्रीरामपूर नगर परिषदेचे प्रशासक किरण सावंत पाटील व  मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री सिद्धार्थ गवारे, सायली दरंदले, साक्षी अहिरे, सचिन जोगदंड, कांचन चावरे, स्वप्नील माळवे, सूर्यभान सातदिवे, विजय झिंगारे, राजेश जेधे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. अजय धाकतोडे यांनी सूत्रसंचलन केलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी स्वाती पुरे यांनी आभार मानले.

COMMENTS