Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याणमध्ये विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू

मुंबई ः कल्याणजवळील मोहने परिसरातील एका 20 वर्षीय तरुणीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले

बारावीच्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी उत्तर
उद्धव ठाकरे आणि माझे शत्रुत्व नाही
औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी 48 लाखांचा साठा जप्त

मुंबई ः कल्याणजवळील मोहने परिसरातील एका 20 वर्षीय तरुणीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राची तरे असे या तरुणीचे नाव असून ती तरुणी इंजिनियरींगचे शिक्षण घेत होती. काही दिवसांपासून प्राचीला ताप येत होता. परिसरातील खाजगी डॉक्टरांकडून तिच्यावर औषध उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने केली तिची ब्लड टेस्ट केली असता तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला उपचारासाठी कल्याणातील रुग्णालयात नेले जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

COMMENTS