Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरेशराव कोते यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अकोले/प्रतिनिधीः रेड स्वस्तिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व लिज्जत पापड उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशराव मारुती कोते यांना नाशिक ज

नगरच्या सहाय्यक निबंधकाला लाच स्वीकारताना पकडले
नगर अर्बन प्रकरणातील डॉक्टरांचे जामीन फेटाळले
अज्ञातांनी दवाखान्यात वापरलेले साहित्य टाकले वस्तीजवळ, कोरोना पसरतोय वेगाने | LokNews24

अकोले/प्रतिनिधीः रेड स्वस्तिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व लिज्जत पापड उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशराव मारुती कोते यांना नाशिक जिल्हा कुंभार विकास समितीच्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
            राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते नाशिक येथे दि. 03 सप्टेंबर रोजी हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आ. देवयानी फरांदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर, महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सतीश दरेकर, रमाकांत क्षीरसागर सोमनाथ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरेशराव कोते हे अहमदनगर जिल्ह्यातील (कोतुळ तालुका अकोले) येथील भूमिपुत्र असून त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकार व धार्मिक संस्थांचे माध्यमातून काम केले आहे. लिज्जत समूहाच्या माध्यमातून महिलांसाठी देशभर रोजगाराचे जाळे निर्माण केले. राज्यात कोते यांचे सामाजिक शैक्षणिक,धार्मिक,अध्यात्म अशा अनेक क्षेत्रात मोठे भरीव काम आहे. त्यांच्या या कार्याबद्दल अनेक वेळा त्यांना विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहे.सातासमुद्रापार त्यांच्या कामाचा गौरव झाला. दुबई येथील संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

लेप्रसी रिहबीटीलेशन ट्रस्टचे ते कार्याध्यक्ष असून, या माध्यमातून लेप्रसी रोगीच्या उद्धारासाठी त्यांनी उत्कृष्ठ काम केल्याने कोते यांना राष्ट्रपती रामनाथ कविंद यांचे हस्ते सन-2019 ला दिल्लीत सन्मान झाला. रेड स्वस्तिकच्या माध्यमातून आरोग्यविषयक कामाचा राज्यपाल भगतसिंग कोषारी, तसेच कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे हस्ते सन्मान झाला होता. सुरेशराव कोते यांना  जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS