शहरटाकळी /प्रतिनिधी ः शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे मंगळवार, दि.5 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरिकां
शहरटाकळी /प्रतिनिधी ः शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे मंगळवार, दि.5 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रस्ता रोको आंदोलन करून बंद पाळण्यात आला.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ला केल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील मराठा बांधव आक्रमक झाले. मंगळवारी सकाळी 9वाजता सकल मराठा समाज हनुमान मंदिर चौकात एकत्र आले. मराठा बांधवांनी आंदोलनास सुरूवात केली. यावेळी आंदोलकांनी जालनाच्या त्या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्याचा तीव्र निषेध नोंदवला. मराठा बांधवांनी आपले मनोगत व्यक्त करीत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. यावेळी अनेक समाजातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. शहरटाकळी बंदला गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थांनी व व्यापारी वर्गाने या बंदला पाठिंबा दिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
COMMENTS