Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 माझ्या यशात समता परिवाराचे महत्त्वपूर्ण योगदान ः अक्षय आव्हाड

कोपरगाव प्रतिनिधी :  माझा क्रीडा क्षेत्रातील प्रवास अपयशातून यशाकडे जाणारा आहे. अपयश, अनुभवातून शिकत गेलो अन् यश मिळत गेले. बेसबॉल या क्रीडा प्रक

कोपरगावात ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सव उत्साहात
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीवर कोट्यावधींची लूट
मनपाचा ऑक्सिजन प्लॅन्ट बेचिराख होता होता राहिला…

कोपरगाव प्रतिनिधी :  माझा क्रीडा क्षेत्रातील प्रवास अपयशातून यशाकडे जाणारा आहे. अपयश, अनुभवातून शिकत गेलो अन् यश मिळत गेले. बेसबॉल या क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून राज्याचे व देशाचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचविण्याची संधी मिळाली. या यशामागे माझे कुटुंब, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक यांचा सिंहाचा वाटा असून समता परिवाराचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. असे वक्तव्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अक्षय आव्हाड यांनी केले.
समता परिवाराचे सदस्य व तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील अक्षय मधुकर आव्हाड यांना महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल बॅडमिंटनपटू व वैद्यकीय क्षेत्रातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.प्रीतम जपे आणि समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचा हस्ते समता परिवार आयोजित सत्कार समारंभात यथोचित सन्मान करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रसिद्ध बॅडमिंटनपटू डॉ.प्रितम जपे म्हणाले की, बेसबॉल या क्रीडा प्रकारात अक्षय आव्हाड यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यामुळे कोपरगाव शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून महाराष्ट्र शासनाने या खेळाच्या लोकप्रियतेची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने त्यांच्याकडे दिली आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक सुधन गोल्ड लोनचे चेअरमन संदीप कोयटे यांनी केले. तसेच हॉलीबॉल व तलवारबाजी खेळाचे राज्यस्तरीय पंच शिवप्रसाद घोडके लिखित ’क्रीडा विश्‍व कोपरगावचे… या लेखाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी अक्षय आव्हाड यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन लेझीमच्या तालात व डिजेच्या सुरात अशा वातावरणात जंगी मिरवणूक काढण्यात आली.
तसेच समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे,जेष्ठ खेळाडू दिलीप दारूणकर,सुनिल गंगुले यांनी मनोगत व्यक्त करून कोणताही खेळाडू एका दिवसात घडत नाही. त्यासाठी प्रयत्न खूप महत्त्वाचे असल्याचे सांगत अक्षय आव्हाड यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी जेष्ठ खेळाडू दिलीप दारुणकर, सुनिल गंगुले,अरुण चंद्रे, मकरंद कोर्‍हाळकर, कोपरगाव तालुका क्रीडा समिती अध्यक्ष नितीन निकम, प्रशिक्षक सुनिल कुटे, जेष्ठ क्रीडा प्रशिक्षक दत्ता देवकर, धनंजय देवकर, सुभाष पाटणकर,बाळासाहेब वक्ते, राजाभाऊ गिरमे, राजेंद्र कोपरे, प्राचार्या हर्षलता शर्मा,मधुकर आव्हाड आदींसह श्रीरामपूर,राहाता, येवला तालुक्यातील आजी-माजी खेळाडू,समता पतसंस्थेचे पदाधिकारी,अधिकारी आणि समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार समता इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य समीर अत्तार यांनी मानले.
-प्रतिक्रिया ः कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व व दातृत्व ज्यांच्याकडे असते. तेच सत्कार समारंभाच्या कार्यक्रमातून त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देऊन भविष्यात साथ देत असतात. त्यातीलच एक समता परिवार आहे. समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांच्याकडे कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व व दातृत्व आहे.कोपरगाव तालुका खेळाडूंची खाण आहे.त्या खाण्यातील कोळशांना चमकविण्याचे काम समता परिवार करत आहे.- अरुण चंद्रे. अध्यक्ष, अहमदनगर बेसबॉल असोसिएशन.-

COMMENTS