Homeताज्या बातम्यादेश

उदयनिधींच्या ’त्या’ वक्तव्याने राजकारण पेटले

सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांशी केली तुलना

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांचे सुपुत्र आणि राज्याचे युवा कल्याण- खेळ विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनात

राज्यातील नागरिकांचे आरेाग्य धोक्यात
विषारी सिरप पिल्याने पाच जणांचा मृत्यू
कष्टप्रद जीवन हा रयतच्या शिक्षकांचा स्थायीभाव : नवनाथ बोडखे        

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांचे सुपुत्र आणि राज्याचे युवा कल्याण- खेळ विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांशी तुलना केल्यामुळे देशात राजकारण पेटतांना दिसून येत अहे. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी एनडीए व प्रामुख्याने भारतीय जनता पक्षानं थेट विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीलाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली. या मुद्द्यावरून वाद वाढू लागा असताना खुद्द उदयनिधी स्टॅलिन यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचे उच्चाटन केले जायला हवे. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचे उच्चाटनच केले जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचेही व्हायला हवे, असे विधान उदयनिधी यांनी चेन्नईत एका कार्यक्रमात केले. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना ही आघाडी भारताची संस्कृती, इतिहास व सनातन धर्माचा अपमान करत आहे, अशी टीका केली. दरम्यान, आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना उदयनिधी स्टॅलिन यांनी त्याचे समर्थनच केले. मी पुन्हा सांगतो. मी फक्त सनातन धर्मावर टीका केली. सनातन धर्माचे उच्चाटन व्हायला हवे असे म्हणालो. मी ते पुन्हा म्हणेन. त्यांना माझ्याविरोधात जे काही गुन्हे दाखल करायचे आहेत, ते त्यांनी करावेत, असे उदयनिधी स्टॅलिन म्हणाले आहेत. भाजप खोट्या बातम्या पसरवत आहे. सत्ताधारी पक्ष इंडिया आघाडीमुळे घाबरले असून लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

काय म्हणाले उदयननिधी – काही गोष्टींना विरोध करता येत नाही., फक्त त्या संपवल्या पाहिजेत. डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला आपण विरोध करू शकत नाही. परंतु, आपल्याला हे संपवायचे आहे. अशाचप्रकारे सनातन धर्माला संपवायचे आहे. सनातन धर्माला विरोध करण्यापेक्षा ते नष्ट केले पाहिजे,सनातन हे नाव संस्कृतमधून आले. ते सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे.

अस्पृश्यता मानणारा सनातन धर्म आम्ही कसा मान्य करणार ?अ‍ॅड. आंबेडकर- उदयनिधी स्टॅलिन यांच्या या विधानानंतर प्रकाश आंबेडकरांनीही सोमवारी सनातन धर्मावर आक्षेप नोंदवला. सनातन धर्मात अस्पृश्यता मानली जाते. आम्ही हे कसे मान्य करणार? असे आंबेडकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. दुसरीकडे, उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, मी पुन्हा सांगतो. मी फक्त सनातन धर्मावर टीका केली. सनातन धर्माचे उच्चाटन व्हायला हवे असे मी म्हणालो. मी ते पुन्हा म्हणेन. ज्यांची माझ्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची इच्छा आहे, त्यांनी ते करावेत.

COMMENTS