Homeताज्या बातम्यादेश

यमुना नदीत बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह असतांना उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यात यमुना नदीत कजारियाचे विसर्जन करण्यासाठी गेलेली 7 मुले

राजकीय नेत्यांचा सपंत्तीचा सोस !
कासारा दुमाला परिसरातील विहिरीत आढळला सतरा वर्षीय युवकाचा मृतदेह LokNews24
जगात भारत अव्वल !

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह असतांना उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यात यमुना नदीत कजारियाचे विसर्जन करण्यासाठी गेलेली 7 मुले पाण्यात बुडाली. यातील 4 मुलांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 3 जणांचा वाचवण्यात गावकर्‍यांना यश आले असून अद्यापही एका मुलाचा शोध घेणे सुरू आहे.
मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुली आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील पैलानीच्या गुडगाव परिसरात ही घटना घडली. रक्षाबंधनाचा सण असल्याने गावातील काही शाळकरी मुले यमुना नदीच्या काठी कजरिया विसर्जनासाठी गेली होती. यावेळी काही मुले पाण्यात उतरली. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने मुले अचानक बुडू लागली. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकर्‍यांनी तातडीने पाण्यात उड्या घेत मुलांचा शोध घेतला. यातील तीन मुलांना वाचवण्यात यश आलं. मात्र, 4 मुलांचा बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या 4 मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. अजूनही एक मुलगा बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशीच गावातील 4 शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिकचा तपास केला जात आहे.

COMMENTS