बीड प्रतिनिधी - बीड शहरातील गेले तीन वर्षापासून तुटलेले दुभाजक दुरुस्तीसाठी बेशरम आंदोलनाची दखल घेत दुरुस्तीला सुरुवात सार्वजनिक बांधकाम व राष्ट
बीड प्रतिनिधी – बीड शहरातील गेले तीन वर्षापासून तुटलेले दुभाजक दुरुस्तीसाठी बेशरम आंदोलनाची दखल घेत दुरुस्तीला सुरुवात सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभाग हे वारंवार जिल्हाधिकारी मार्फत निवेदन तक्रार देऊनही दुभाजक दुरुस्त करत नव्हते जिल्हाधिकार्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवणार्या बेशरम अधिकारी यांच्या निषेधार्थ बेशरमचे झाड लावत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुभाजकावर बसून बेशरम आंदोलन सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सरपते यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निषेधार्थ 15 ऑगस्ट रोजी फुले वाहून दुभाजकाचे तृतीय पुण्यस्मरण करत आंदोलन करण्यात आले होते.
वारंवार निवेदने तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा करून आणि अनेकवेळा उपजिल्हाधिकारी बीड व संबंधित बांधकाम कार्यालयातील अधिकारी यांच्या निष्काळजीपणा मुळे प्रलंबित असुन तातडीने दुभाजक दुरुस्त करण्यात यावीत मागणीला अखेर यश आले पण व हॉटेल शांताई ते हॉटेल साई पॅलेस पर्यंत नवीन डिव्हायडर दुभाजक तात्काळ करून घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सरपते यांच्या नेतृत्वाखाली आज दि.15 मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुभाजकावर बसून बेशरम आंदोलन करण्यात येऊन मा.ना धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले होते अखेर बांधकाम विभागाने याची दखल घेत आज 25ऑगस्ट रोजी रंग रंगोटी करत थातूरमातूर दुभाजक दुरुस्तीला सुरुवात केली.
COMMENTS