Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गरजांची पूर्तता करणारी जीवन विमा योजना उपलब्ध करून देण्यात येणार 

नाशिक: एचडीएफसी लाइफ हे भारतातील एक आघाडीचे विमाकर्ते आणि २०६ वर्षांचा वारसा असलेली एनकेजीएसबी बँक यांनी आज कॉर्पोरेट एजन्सी हातमिळवणी केली. या अ

केवायसी करणे पडले महागात; 97 हजार रुपयांना गंडा
महावितरणकडून दिवाळी गोड करण्याचे आवाहन  
टू-व्हीलर ब्रँड लॅम्ब्रेटा 2023 मध्ये भारतात पुनरागमन करणार आहे.

नाशिक: एचडीएफसी लाइफ हे भारतातील एक आघाडीचे विमाकर्ते आणि २०६ वर्षांचा वारसा असलेली एनकेजीएसबी बँक यांनी आज कॉर्पोरेट एजन्सी हातमिळवणी केली. या अंतर्गत एनकेजीएसबी बँकेच्या ग्राहकांना एचडीएफसी लाइफच्या आयुर्विमा उत्पादनांचा लाभ घेता येणार आहे.विम्याची व्याप्ती आणि घनता या दोहोंचा विचार करता भारतात बहुतांश लोकांकडे विम्याचे संरक्षण नाही. अशा प्रकारची भागीदारी ग्राहकांसाठी हितकारक आहे. कारण त्यामुळे जीवन विमा उत्पादने उपलब्ध होण्याची सुलभता वाढते. या वितरणामुळे ग्राहकांना एचडीएफसी लाइफची पारंपरिक, टर्म, पेन्शन आणि ॲन्युइटी उत्पादने घेता येतील.नावीन्यपूर्ण उत्पादने व ग्राहककेंद्री दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या एचडीएफसी लाइफने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ६ कोटी ८० लाखांहून अधिक व्यक्तींना विमा संरक्षणाच्या कक्षेत आणले आणि त्यांचा क्लेम सेटलमेंट रेश्यो ९९.७% इतका होता. या प्रसंगी एचडीएफसी लाइफचे व्यवस्थापकीय उपसंचालक सुरेश बदामी म्हणाले, “एनकेजीएसबीसोबतची आमची भागीदारी जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्यांचा समृद्ध वारसा व एकनिष्ठ ग्राहक लक्षात घेत आमचा बँकॅश्युअरन्स अनुभव आणि भक्कम उत्पादन वैशिष्ट्ये यांचा उपयोग करून घेऊ शकू आणि २०४७ पर्यंत ‘सर्वांसाठी विमा’ हे भारताचे व्हिजन साध्य करण्याच्या दृष्टीने एकत्रित काम करू शकू, अशी आम्हाला आशा आहे.”या नव्या सहयोगाबद्दल एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पानसे म्हणाले, “१०६ वर्षांचा वारसा असलेची एनकेजीएसबी बँक एचडीएफसी लाइफ इन्श्युरन्स कंपनीशी धोरणात्मक व अतिशय महत्त्वाची हातमिळवणी करत आहे. या अंतर्गत संरक्षण, पेन्शन, बचत, गुंतवणूक आणि ॲन्युइटी या गरजांची पूर्तता करणारी जीवन विमा योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात हातमिळवणीतून, आपल्या मौल्यवान ग्राहकांचे हित व आर्थिक संरक्षणाची खातरजमा करण्याचा बँकेचा निर्धार दिसून येतो.”

COMMENTS